---Advertisement---

फक्त ती गोष्ट जमली तर कोहलीला कोलकाता कसोटीत अच्छे दिन…

On: बुधवार, नोव्हेंबर 20, 2019 6:50 PM
---Advertisement---

22 नोव्हेंबरपासून इडन गार्डन, कोलकाता येथे भारत विरुद्ध बांगलादेश (India vs Bangladesh) संघात दुसरा कसोटी सामना (2nd Test Match) पार सुरू होणार आहे. हा कसोटी सामना भारतातील तसेच भारतीय संघाचा पहिलाच दिवस-रात्र कसोटी (Day-Night Match) सामना असणार आहे.

इंदोर (Indore) येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताने एक डाव आणि 130 धावांनी विजय मिळवला होता. तसेच दुसऱ्या कसोटी सामन्यातही असाच काहीसा सामना जिंकत भारतीय संघ मालिका खिशात घालण्याचा विचार करत असणार.

या सामन्यात भारताचा कर्णधार विराट कोहलीला (Virat Kohli) अनोखा विक्रम करण्याची संधी आहे. पहिल्या कसोटी सामन्यात कोहली शून्यावर बाद झाला होता. परंतु दुसऱ्या सामन्यात पुन्हा फाॅर्ममध्ये परतत तो एक खास विक्रम करु शकतो.

कसोटी कर्णधार म्हणून 5000 धावा पूर्ण करण्यासाठी  कोहलीला फक्त 32 धावांची गरज आहे. या 5000 धावा पूर्ण केल्यानंतर ही कामगिरी करणारा तो पहिलाच भारतीय ठरणार आहे.

जगातील केवळ सहा क्रिकेटपटूंना अशी कामगिरी करता आलेली आहे. ग्रॅमी स्मिथ (Graeme Smith), ऍलन बॉर्डर (Allan Border), रिकी पाँटिंग (Ricky Ponting), क्लाइव्ह लॉयड (Clive Llyod) आणि स्टीव्ह फ्लेमिंग (Steve Fleming) यांसारख्या दिग्गजांनी यापुर्वी अशी कामगिरी केली आहे.

कोलकाता कसोटी गुलाबी चेंडूचा सामना करण्यासाठी कोहली व अन्य भारतीय फलंदाजांना चांगला खेळ करावा लागणार आहे.

दुसरा कसोटी सामना एसजी कंपनीच्या गुलाबी चेंडूने खेळवला जाईल. गुलाबी चेंडू् या सामन्यात कशा प्रकारे वापरला जातो हे पहिल्यांदाच भारतीयांना पहायला मिळणार आहे.

कर्णधार असताना 5000 धावा पूर्ण करणारे खेळाडू-

8659 धावा – ग्रॅमी स्मिथ

6623 धावा – ऍलन बॉर्डर

6542 धावा – रिकी पाँटिंग

5233 धावा – क्लाइव्ह लॉयड

5156 धावा – स्टीव्ह फ्लेमिंग

4968 धावा – विराट कोहली

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---