---Advertisement---

इंग्लंड विरुद्ध चालू सामन्यात भारताला मोठा धक्का; गंभीर दुखापतीमुळे ‘या’ दोन खेळाडूंनी सोडलं मैदान

On: मंगळवार, मार्च 23, 2021 8:28 PM
---Advertisement---

पुणे। भारत विरुद्ध इंग्लंड संघात सध्या पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, गंहुजे येथे ३ सामन्यांची वनडे मालिका सुरु आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यादरम्यान भारतीय संघाला जोरदार धक्का बसला आहे. भारताचा क्रिकेटपटू श्रेयस अय्यरच्या खांद्याला मोठी दुखापत झाली आहे. तसेच रोहित शर्माही दुखापतग्रस्त झाला आहे.

झाले असे की सामन्यात इंग्लंडच्या डावाच्या ८ व्या षटकात शार्दुल ठाकूरच्या चेंडूवर जॉनी बेअरस्टोने फटका खेळला. तो चेंडू आडवण्यासाठी श्रेयस अय्यरने उडी मारली. पण त्याचवेळी त्याच्या खांद्याला दुखापत झाली. त्यावेळी तो वेदनेने कळवतानाही दिसला. त्याला नंतर मैदानाबाहेर घेऊन जाण्यात आले.

त्याच्या या दुखापतींबद्दल बीसीसीआयने ट्विटरवर माहिती दिली आहे की श्रेयसचा खांदा निखळला असून त्याला स्कॅनसाठी हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यात आले आहे. त्यामुळे तो उर्वरित सामन्यात सहभागी होणार नाही.

तसेच रोहित शर्माला देखील फलंदाजी करता वेळी उजव्या हाताच्या कोपऱ्याला चेंडू लागल्याने दुखापत झाली होती. पण त्याने फलंदाजी करणे कायम ठेवले होते. मात्र, त्याला नंतर वेदना जाणवत असल्याने तो देखील क्षेत्ररक्षणासाठी मैदानात उतरलेला नाही.

श्रेयस आणि रोहित शर्माच्या ऐवजी क्षेत्ररक्षणासाठी सुर्यकुमार यादव आणि शुबमन गिल हे राखीव क्षेत्ररक्षक म्हणून मैदानात उतरले आहेत.

भारताचे इंग्लंडला ३१८ धावांचे आव्हान

या सामन्यात भारताने इंग्लंडला ३१८ धावांचे आव्हान दिले आहे. या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले. त्यामुळे प्रथम फलंदाजी करताना भारताने ५ बाद ३१७ धावा केल्या. यावेळी भारताकडून शिखर धवन (९८), विराट कोहली (५६), केएल राहुल (६२*) व कृणाल पंड्या (५८*) यांनी अर्धशतके ठोकली. तसेच रोहितने २८ आणि श्रेयसने ६ धावांची खेळी केली. इंग्लंडसाठी गोलंदाजी करताना अष्टपैलू बेन स्टोक्सने ३ तर, मार्क वूडने २ गडी बाद केले.

महत्त्वाच्या बातम्या –

क्रिकेटमध्ये १९ वर्षांपूर्वी घडली होती ‘ती’ दु:खद घटना; बॉथमसोबत तुलना होत असलेल्या २४ वर्षीय खेळाडूने गमावला होता जीव

असा रनआऊट तुम्ही पाहिला नसेल! जिमी नीशमने फुटबॉल स्किल दाखवत केले तमिमला बाद, पाहा व्हिडिओ

इंग्लंडच्या ‘या’ खेळाडूला फिल्डिंग करतांना झाली दुखापत, फलंदाजीला येण्याबाबतही साशंकता

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---