---Advertisement---

असा रनआऊट तुम्ही पाहिला नसेल! जिमी नीशमने फुटबॉल स्किल दाखवत केले तमिमला बाद, पाहा व्हिडिओ

On: मंगळवार, मार्च 23, 2021 8:10 PM
---Advertisement---

न्यूझीलंड आणि बांगलादेश यांच्यात सुरू असलेल्या ३ वनडे सामन्यांच्या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात न्यूझीलंड संघाने ५ गडी राखून विजय मिळवला आहे. या विजयासोबतच न्यूझीलंड संघाने या मालिकेत २-० ने आघाडी घेतली आहे. दुसऱ्या सामन्यातील पहिल्या डावात बांगलादेश संघ फलंदाजी करत असताना तमिम इकबाल याला जिमी नीशमने आगळ्या-वेगळ्या प्रकारे धावचीत करताना पाहायला मिळाले आहे.

या सामन्यात बांगलादेश संघाने प्रथम फलंदाजी करताना ६ गडी बाद २७१ धावा केल्या होत्या. या डावात फलंदाजी करत असताना बांगलादेश संघाचा फलंदाज तमिम इकबाल हा सॉफ्ट सिग्नलमुळे बाद होता होता राहिला होता. त्यानंतर तो आगळ्या-वेगळ्या प्रकारे धावचीत झाला होता.

तर झाले असे की, जिमी नीशमने चेंडू टाकला तो चेंडू मुशफिकुर रहीमने खेळला. तो चेंडू क्रीजच्या जवळच पडला होता. परंतु मुशफिकुर रहीमने तमिमला एक धाव घेण्यासाठी बोलवले. तमिम धाव घेण्यासाठी धावला, परंतु नीशमने आपल्या फुटबॉल कौशल्याचा वापर करत त्याला धावचीत केले. त्याने आपल्या पायाने चेंडूला फुटबॉल किक मारत यष्टीचा दिशेने ढकलले आणि तमिमला धावचीत केले. हा व्हिडिओ न्यूझीलंड संघाच्या अधिकृत सोशल मीडियावर अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे.

या सामन्यात न्यूझीलंड संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. बांगलादेश संघाकडून तमिम इकबाल याने सर्वाधिक ७८ धावांची खेळी केली. तर मोहम्मद मिथुन याने नाबाद ७३ धावांची खेळी केली. तसेच मुशफिकुर रहीम याने ३४ धावांचे योगदान दिले. ५० षटक अखेर बांगलादेश संघाने ६ बाद २७१ धावा केल्या होत्या.

प्रतिउत्तरादाखल, न्यूझीलंड संघाकडून २७२ धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या सलामी फलंदाजांना चांगली सुरुवात मिळाली नाही. पण सलामी फलंदाज मार्टिन गप्टील हा अवघ्या २० धावा करत माघारी परतला. मात्र त्यानंतर टॉम लॅथमने शतक झळकवत नाबाद ११० धावांची खेळी केली. तसेच कॉनव्हे याने ७२ धावांची खेळी केली. तसेच जिमी नीशमने ३० धावांची योगदान दिले. न्यूझीलंड संघाने हा सामना ५ गडी राखून जिंकला.

महत्त्वाच्या बातम्या –

इंग्लंडच्या ‘या’ खेळाडूला फिल्डिंग करतांना झाली दुखापत, फलंदाजीला येण्याबाबतही साशंकता

‘तुम्हाला फक्त पंड्या कुटुंबाकडे पहावे लागेल’, हार्दिकने का दिले असे उत्तर, जाणून घ्या

आठवणीतील सामना: भारतीय संघ १८ वर्षांपूर्वी क्रिकेटमधील सर्वात मोठा सामना झाला होता पराभूत

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---