भारत विरुद्ध इंग्लंडचा पहिला वनडे सामना आजपासून पुण्याच्या महाराष्ट्र क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जात आहे. या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या डावात भारताने ५० षटकांत ५ बाद ३१७ धावा उभारल्या.
मात्र या डावात इंग्लंडसाठी एक वाईट गोष्ट घडली. भारताची फलंदाजी चालू असतांना क्षेत्ररक्षण करत असलेल्या इंग्लंडच्या एका खेळाडूला दुखापत झाली. सॅम बिलिंग्ज असे या खेळाडूचे नाव आहे.
चौकार अडवताना झाली दुखापत
ही घटना ३३ व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर घडली. या चेंडूवर भारताचा फलंदाज शिखर धवनने एक जोरदार फटका मारला. तो अडवण्यासाठी बिलिंग्जने धाव घेतली आणि डाइव्ह मारली. मात्र त्याला तो चौकार अडवण्यात यश आले नाही. परंतु, चौकार जाण्यापेक्षा अजून वाईट गोष्ट इंग्लंडच्या संघासाठी घडली ती म्हणजे बिलिंग्जला हा चौकार अडवण्याच्या प्रयत्नात दुखापत झाली. या प्रयत्नात त्याचा डावा खांदा दुखावला गेला. त्यानंतर तो बराच काळ वेदनेने कळवळताना दिसला.
त्याला पाहून इंग्लंडच्या वैद्यकीय पथकाने लगेचच मैदानावर धाव घेतली. त्यांनी पाहणी केल्यानंतर बिलिंग्जच्या कॉलर बोनला दुखापत झाल्याचे स्पष्ट झाले. या घटनेनंतर त्याने मैदान सोडले. तसेच दुसर्या डावात तो फलंदाजीला उतरेल की नाही, याबाबत देखील साशंकता आहे.
https://twitter.com/sportzhustle/status/1374311728381530120?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1374311728381530120%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fwww.sportstiger.com%2Fwatch-sam-billings-seriously-injured-after-a-valiant-effort-while-fielding%2F
दरम्यान, भारताने दिलेल्या ३१८ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करतांना इंग्लंड २१ षटकानंतर सुस्थितीत आहे. सलामीला झालेल्या दमदार भागीदारीमुळे अवघ्या २१ षटकातच इंग्लंडने १६५ धावा केल्या आहेत. भारताचा पदार्पणवीर प्रसिद्ध कृष्णाने २ बळी पटकाविले आहेत. मात्र सलामीवीर जॉनी बेअरिस्टो ९३ धावांवर खेळत असून कर्णधार इयॉन मॉर्गन १७ धावांवर त्याला साथ देतो आहे.
महत्वाच्या बातम्या:
आठवणीतील सामना: भारतीय संघ १८ वर्षांपूर्वी क्रिकेटमधील सर्वात मोठा सामना झाला होता पराभूत
अर्धशतक झळकवल्यावर पंड्या आणि राहुलचे खास सेलिब्रेशन, पाहा व्हिडिओ