पुणे। भारत विरुद्ध इंग्लंड संघात सुरु झालेल्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिला सामना महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, गंहुजे येथे झाला. या सामन्यातून अष्टपैलू क्रिकेटपटू कृणाल पंड्याने वनडे पदार्पण केले आहे. या पदार्पणाच्या सामन्यातच त्याने अर्धशतकी खेळी केली. या अर्धशतकी खेळीनंतर कृणाल भावूक झालेला दिसला.
त्याने २६ चेंडूत अर्धशतक झळकावले. त्यामुळे वनडे पदार्पणाच्या सामन्यात सर्वात जलद अर्धशतक झळकावण्याचा विक्रम त्याच्या नावावर झाला आहे. कृणालने ७ चौकार व २ षटकारांच्या मदतीने ३१ चेंडूत नाबाद ५८ धावांची खेळी केली. यासोबतच पदार्पणात सातव्या क्रमांकावर फलंदाजीला येत अर्धशतक झळकवणारा देखील तो पहिला भारतीय फलंदाज बनला.
अर्धशतकानंतर भावूक झाला कृणाल
कृणालने पहिल्या वनडेत अर्धशतक करतात बॅट आकाशाकडे उंचावत हे अर्धशतक आपल्या दिवंगत वडीलांना अर्पण केले. हार्दिक आणि कृणाल पंड्या या बंधूंच्या वडीलांचे जानेवारी महिन्यात हृदयविकाराच्या धक्क्याने आकस्मित निधन झाले होते.
तसेच भारताचा डाव संपल्यानंतरही कृणाल मुलाखत देताना भावूक झाला. त्याला अश्रू अनावर झाल्यामुळे बोलताही येत नव्हते. अखेर नंतर त्याला धाकटा भाऊ हार्दिकने त्याला मिठी मारत आधार दिला. या घटनेचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.
https://twitter.com/Deep7006/status/1374337202612805638
Krunal Pandya dedicates 50 on debut to his father, who passed away recently. Some very emotional scenes. He couldn’t get his words together in the post-inns interview. Deserved this hug. #IndvEng pic.twitter.com/mxYtwffl5q
— Mazher Arshad (@MazherArshad) March 23, 2021
#KrunalPandya
Unbelievable
Fastest international 50 on debut ????
And so emotional he could not conduct the interview as he dedicated it to his father… something that truly resonates with me
Bless him #INDvENG pic.twitter.com/kAQAo2Xcb1— Neilby_Gooner 70 ⚽ (@Neilby70) March 23, 2021
What a debut. Proud moment #krunalpandya #INDvENG pic.twitter.com/aJEvp4HRxD
— Debojyoti Chatterjee (@Debojyo26678013) March 23, 2021
पदार्पणाची कॅप स्विकारल्यानंतर भावूक झाला होता कृणाल –
हा सामना सुरु होण्याआधी कृणाल पंड्या आपला लहान भाऊ हार्दिकच्या हातून कॅप स्वीकारताना देखील कमालीचा भावूक झाला होता. कॅप स्वीकारत तो हार्दिकच्या गळ्यात पडला व त्यानंतर ती कॅप त्याने आभाळाकडे दाखवली होती. हार्दिक आणि कृणाल हे दोघेही त्यांच्या वडीलांच्या फार जवळ होते.
भारताने उभाला धावांचा डोंगर
या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते. त्यामुळे प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने पहिल्या वनडेत प्रथम फलंदाजी करताना ३१७ धावांचा डोंगर उभारला. भारतासाठी शिखर धवन (९८), विराट कोहली (५६), केएल राहुल (६२*) व कृणाल पंड्या (५८*) यांनी अर्धशतके ठोकली. इंग्लंडसाठी अष्टपैलू बेन स्टोक्सने ३ तर, मार्क वूडने २ गडी बाद केले.
महत्त्वाच्या बातम्या –
कोहलीला म्हंटले होते गर्विष्ठ तर धोनीला कलंक; इंग्लंडचा ‘हा’ खेळाडू जुन्या ट्विटवरून होतोय ट्रोल
पदार्पणाची कॅप स्वीकारताना भावूक झालेल्या कृणाल पंड्यासाठी वसीम जाफरचा खास संदेश, म्हणाला…
पदार्पणाच्या सामन्यातच कृणालचा विश्वविक्रम! ‘असा’ कारनामा करणारा बनला पहिलाच क्रिकेटर