---Advertisement---

पहिल्या सामन्यात टीम इंडियाने विजय मिळवल्यानंतर ट्विटरवर ‘लॉर्ड शार्दुल’ ट्रेंड, ‘हे’ आहे कारण

On: बुधवार, मार्च 24, 2021 12:29 PM
---Advertisement---

भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिला वनडे सामना मंगळवारी (२३ मार्च) पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने बलाढ्य इंग्लंड संघावर ६६ धावांनी विजय मिळवला आहे. या विजयासोबतच भारतीय संघाने मालिकेत १- ० ने आघाडी घेतली आहे. भारतीय संघातील फलंदाजांनी उल्लेखनीय कामगिरी करत ३१७ धावांचा डोंगर उभा केला होता. या धावांचा बचाव करताना भारतीय संघातील गोलंदाजांनी देखील महत्त्वाची भूमिका बजावली आहे. यात भारतीय वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूरने जबरदस्त कामगिरी केली. आता या सामन्यानंतर ट्विटरवर ‘लॉर्ड शार्दुल’ प्रचंड ट्रेंड होत आहे.

भारतीय संघाने इंग्लंड संघासमोर ३१८ धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंड संघातील सलामी फलंदाज जॉनी बेअरस्टो आणि जेसन रॉय यांनी आक्रमक सुरुवात करून देत १३५ धावांची भागीदारी केली होती. तसेच भारतीय गोलंदाजांना पूर्णपणे बॅकफूटवर टाकले होते. त्यांनतर प्रसिद्ध कृष्णाने जेसन रॉयला बाद करत भारतीय संघाला पहिला गडी बाद करून दिला. यानंतर भारतीय संघाने सामन्यात पुनरागमन केले होते. पुढील षटकात त्याने बेन स्टोक्सला देखील बाद केले होते.

का होतंय ‘लॉर्ड शार्दुल’ ट्रेंड??
गेल्या काही सामन्यांपासून शार्दुल ठाकूर भारतीय संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावत आहे. त्याने या सामन्यात देखील एकाच षटकात २ महत्त्वाचे फलंदाज बाद करण्याचा विक्रम केला आहे. या सामन्यात पहिल्या ३ षटकात तब्बल ३० धावा खर्च करणाऱ्या शार्दुलने पुढील २ षटकात इंग्लंड संघाचे महत्त्वाचे ३ फलंदाज बाद केले. त्याने सुरुवातीला जॉनी बेअरस्टोला बाद केले तसेच पुढील षटकात ऑयन मॉर्गन आणि जोस बटलर यांना बाद केले. त्याने सलग तिसऱ्या सामन्यात एकाच षटकात २ गडी बाद करण्याचा विक्रम केला आहे. ज्यामुळे चाहत्यांनी त्याला ‘लॉर्ड शार्दुल’ची उपमा दिली आहे. तसेच ट्विटर वर ‘लॉर्ड शार्दुल’ या नावाने अनेक मीम्स देखील शेअर केले जात आहेत.

शार्दुल ठाकूरची कामगिरी
जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी यांसारख्या अनुभवी गोलंदाजांच्या अनुपस्थितीत शार्दुल ठाकूर भारतीय संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावत आहे. त्याने आतापर्यंत भारतीय संघासाठी एकूण १३ वनडे सामने खेळले आहेत. यात त्याने १८ गडी बाद केले आहेत. तसेच त्याने भारतीय संघासाठी एकूण २२ टी२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. यात त्याने ३१ गडी बाद केले आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये त्याला अवघे २ सामने खेळण्याची संधी मिळाली. यात त्याने ७ गडी बाद केले आहेत. हे कसोटी सामने त्याने ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध खेळले होते.

महत्त्वाच्या बातम्या-

-त्यावेळी किरण मोरेंनी पैश्यांना प्राधान्य दिले असते तर आज कृणाल-हार्दिक टीममध्ये दिसले नसते

-मिशेल स्टार्कने केला मोठा खुलासा; ‘या’ कारनामुळे घेतला आयपीएल २०२१ हंगामात न खेळण्याचा निर्णय

-भारतीय संघाबरोबरच दिल्ली कॅपिटल्सला मोठा धक्का; ‘इतक्या’ दिवस श्रेयस अय्यर राहू शकतो क्रिकेटपासून दूर

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---