---Advertisement---

ड्राॅ? १ विकेटच बाकी तरीही भारत विरुद्ध इंग्लंड तिसरा कसोटी सामना राहु शकतो ड्राॅ?

On: बुधवार, ऑगस्ट 22, 2018 9:48 AM
---Advertisement---

नॉटींगघम। इंग्लंड विरुद्ध भारत संघात ट्रेंटब्रिज मैदानावर सुरु असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडने मंगळवारी (21 आॅगस्ट) चौथ्या दिवसाखेर 9 बाद 311 धावा केल्या आहेत. या सामन्यात भारताला विजयासाठी 1 विकेटची तर इंग्लंडला 210 धावांची गरज आहे.

काल शेवटच्या १६ षटकांत भारतीय संघाला इंग्लंडच्या दोन विकेट्स घेता आल्या नाही. अदिल राशिद आणि स्टुअर्ट ब्राॅड जोडीने चांगलाच किल्ला लढवला. तसेच शेवटच्या ५.२ षटकांत एक विकेट हवी असतानाही भारतीय गोलंदाजांना ती मिळविण्यात अपयश आले.

हेच अपयश आता भारतासाठी डोकेदुखी ठरु शकते. कारण काही संकेळतस्थळांनी आज नॉटींगघममध्ये पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे तसेच सोशल माध्यमांवरही याची जोरदार चर्चा सुरु आहे.

accuweather.com प्रमाणे आज नॉटींगघममध्ये हवामान दिवसभर ढगाळ राहिल तसेच पावसाच्या हलक्या सरींची शक्यता वर्तविण्यात आली आहे. bbc.com/weatherनेही काहीसा असाच अंदाज व्यक्त केला आहे.

काही संकेळतस्थळांनुसार येथे दुपारी ३ वाजता पावसाला सुरुवात होईल. गमतीचा भाग म्हणजे गेल्या काही तासांत गुगलवर Nottingham Weather ही टर्म सर्वात जास्त सर्च केली जात आहे.

https://twitter.com/mikebirty/status/1031966949847252999

https://twitter.com/keshyperion/status/1032109674378670081

https://twitter.com/wx_nottingham/status/1032108948667674626

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या:

इंग्लड विरुद्ध भारत संघातील तिसऱ्या कसोटीत झाला हा खास विक्रम

केरळच्या महापूरात कुटुंब अडकल्यानंतरही भारताच्या या जलतरणपटूची एशियन गेम्समध्ये चमकदार कामगिरी

सर्व प्रश्नांचं उत्तर केवळ काळ देतो, रुट-कोहलीची ही आकडेवारी पाहुन कळेल नक्की कसे?

,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment