नॉटींगघम। इंग्लंड विरुद्ध भारत संघात ट्रेंट ब्रिज मैदानावर तिसरा कसोटी सामना सुरु आहे. या सामन्यात भारतीय संघातील खेळाडू पहिल्या दिवशी (18 आॅगस्ट) हाताला काळी पट्टी बांधून मैदानात उतरले होते.
भारतीय संघाने ही काळी पट्टी भारताचे माजी कर्णधार अजित वाडेकर आणि भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या सन्मानार्थ बांधली होती. वाडेकरांचे बुधवारी (15 आॅगस्ट) आणि वाजपेयींचे गुरुवारी (16 आॅगस्ट) निधन झाले.
याबद्दल बीसीसीआयने अधिकृत ट्विटर अकाउंटवरुन याची माहिती दिली. बीसीसीआयने ट्विट केले आहे की, “भारतीय संघाने भारताचे माजी कर्णधार अजित वाडेकर आणि भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना आदरांजली वाहण्यासाठी काळी पट्टी बांधली आहे.”
The Indian Cricket Team is wearing black armbands as a mark of respect to former India captain Shri Ajit Wadekar and former India Prime Minister Shri Atal Bihari Vajpayee, who passed away recently. pic.twitter.com/vXMEFyODuy
— BCCI (@BCCI) August 18, 2018
वाडेकर हे भारताचे वनडे क्रिकेटमधील (मर्यादित षटकांचे) पहिले कर्णधार होते. तसेच परदेशात सलग दोन कसोटी मालिका जिंकणारे पहिले भारतीय कर्णधार होते.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या:
–एशियन गेम्स: भारताकडून अपूर्वी चंदेला आणि रवी कुमार यांना नेमबाजीत कांस्यपदक
–टीम इंडिया विरुद्ध असा पराक्रम करणारा जेम्स अँडरसन दुसराच गोलंदाज
–विराट कोहलीच्या आंतरराष्ट्रीय पदार्पणाला 10 वर्षे पूर्ण…