---Advertisement---

क्रिकेटप्रेमींसाठी खुशखबर! दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी ‘इतक्या’ प्रेक्षकांना मिळणार स्टेडियममध्ये प्रवेश

On: बुधवार, फेब्रुवारी 3, 2021 10:26 AM
---Advertisement---

भारत विरुद्ध इंग्लंड संघात ५ फेब्रुवारीपासून ४ सामन्यांची कसोटी मालिका सुरु होणार आहे.ही मालिका कोरोनाच्या संकटानंतरची भारतात होणारी पहिली आंतरराष्ट्रीय मालिका आहे. या मालिकेतील पहिले २ सामने चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडीयम मध्ये खेळला जाणार आहेत. पहिला सामना ५ ते ९ फेब्रुवारी तर दुसरा सामना १३ ते १७ फेब्रुवारीदरम्यान होणार आहे. ही मालिका सुरु होण्याआधी तमिळनाडू क्रिकेट असोसिएशनने क्रिकेट रसिकांना आनंदाची बातमी दिली आहे.

कोरोना साथीच्या पार्श्‍वभूमीवर गतवर्षी मार्चपासून देशभरात टाळेबंदी लागू झाल्यापासून भारतात आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळवण्यात आले नव्हते. परंतु, आता भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिले दोन सामने चेन्नईला तर दुसरे दोन सामने आमदाबाद येथे होणार आहेत. दरम्यान, अद्यापही अनेक क्रीडा सामने बंद दारामागे म्हणजे प्रेक्षकांविना होत आहेत. भारत-इंग्लंड मालिकेतील पहिला कसोटी सामनाही प्रेक्षकांशिवाय पार पडणार आहे. पण असे असले तरी दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी मात्र स्टेडियमवर प्रेक्षकांना देखील हजेरी लावता येणार असल्याची माहिती तमिळनाडू क्रिकेट असोसिएशनने दिली आहे.

काही दिवसांपूर्वीच बीसीसीआय आणि तामिळनाडू क्रिकेट असोसिएशनने प्रेक्षकांना परवानगी देण्याबाबत चर्चा केली होती. मात्र कसोटी मालिकेतील सामने बंद दाराआडच्या खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. परंतु आता राज्य मंत्रालयाने जारी केलेल्या नवीन निर्देशानुसार प्रेक्षकांना प्रवेश दिला जाणार आहे. दुसऱ्या सामन्यासाठी स्टेडियमच्या आसन क्षमतेच्या ५० टक्के प्रेक्षकांना प्रवेशाची अनुमती देण्यात आली आहे.

तामिळनाडू क्रिकेट असोसिएशनच्या सचिवांनी सांगितले आहे की, ” भारत आणि इंग्लंड यांच्यात होणारा १३ ते १७ फेब्रुवारी पर्यंत सामना आहे या सामन्यात ५० टक्के चाहत्यांना अनुमती दिली जाणार आहे”. त्यांनी पुढे म्हटले आहे की कोविड १९ ची परिस्थिती पाहता भारत आणि इंग्लंड यांच्यात चेन्नईच्या चिदंबरम स्टेडियमवर होणार पहिला कसोटी सामना हा प्रेक्षकांच्या अनुपस्थितीमध्ये खेळला जाईल.

या अगोदर २ डिसेंबर रोजी देशातील सुरू असलेल्या क्रीडा स्पर्धा पुन्हा सुरू करण्याच्या मानक कार्यपद्धतीनुसार, क्रीडा मंत्रालयाने मैदानाच्या क्षमतेनुसार ५० टक्के प्रेक्षकांना उपस्थित राहण्याची परवानगी दिली होती.

भारतीय क्रिकेट संघाच्या खेळाडूंनी पहिल्या सामन्याच्या तयारीसाठी मंगळवारपासून प्रशिक्षणाला सुरवात केली आहे. तसेच इंग्लंड संघाच्या प्रशिक्षणालाही सुरुवात झाली आहे.

इंग्लंडचा संघ भारत दौऱ्यात ४ कसोटी, ५ टी २० आणि ३ एकदिवसीय सामने खेळणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

ATP Cup : नदालची पाठदुखीमुळे माघार; तर जोकोविचच्या सार्बियन संघाची विजयाने दिमाखात सुरुवात

धक्कादायक! फाईट सुरू असताना बॉक्सरच्या चेहऱ्याला मुक्का लागून मृत्यू, पहा व्हिडिओ

ऑस्ट्रेलियाच्या वेगवान गोलंदाजीची परंपरा पुढे नेणारा नॅथन कुल्टर-नाईल

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---