मॅंचेस्टर | मंगळवार, ३ जूलै रोजी भारत विरुद्ध इंग्लंड पहिल्या टी२० सामन्यात भारतीय संघाला अनेक विक्रम करण्याची संधी आहे. त्यात सलामीविरांपासून सर्वच खेळाडूंना मोठी संधी आहे.
यातील काही विक्रम नक्की होतील. ते असे-
३०० षटकार-
सुरेश रैनाला टी२०मध्ये ३०० षटकार पुर्ण करण्याची संधी आहे. त्याने सर्व प्रकारच्या टी२० सामन्यांत मिळुन २९५ षटकार खेचले आहे.
रैना आजपर्यंत २९३ टी२० सामने खेळले आहेत. त्यात त्याने ७९०२ धावा करताना ७०२ चौकार आणि २९८ षटकार खेचले आहे.
टी२० मध्ये आजपर्यंत केवळ ७ खेळाडूंनी ३०० षटकार मारले आहेत. त्यात रोहित शर्मा हा भारताचा एकमेव खेळाडू आहे. रोहितने २८६ सामन्यात ३०७ षटकार खेचले आहे.
या यादीत अव्वल स्थानी ख्रिस गेल असून त्याने ३३५ सामन्यात ८४६ षटकार मारले आहेत. जगात अन्य कोणत्याही खेळाडूला ५२८ पेक्षा जास्त षटाकार टी२० सामन्यांत मारता आलेले नाही.
५० षटकार-
धोनीने ९० आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यात ४६ षटकार मारले आहेत. या सामन्यात जर धोनीने ३ षटकार मारले तर आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यांत ५० षटकार मारणारा तो जगातील २४वा खेळाडू ठरणार आहे.
भारताकडून यापुर्वी रोहित शर्मा (८३), सुरेश रैना(५७) आणि युवराज सिंग (७४) यांनी ५० षटकार मारले आहेत.
आंतरराष्ट्रीय टी२०मध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम ख्रिस गेलच्या नावावर आहे. त्याने ५६ सामन्यात १०३ षटकार मारले आहेत. त्याबरोबर ७५ सामन्यात १०३ षटकार ठोकत न्युझीलंडचा मार्टीन गप्टीलही अव्वल स्थानावर विराजमान आहे.
२००० धावा
विराट कोहली या सामन्यात आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यांत २००० धावा करण्याची मोठी संधी आहे. सध्या त्याच्या नावावर ५९ सामन्यात १९९२ धावा. त्याने आज ०८ धावा केल्या तर टी२०मध्ये २००० धावा करणारा तो चौथा फलंदाज होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
–टीम इंडियाच्या कर्णधार-उपकर्णधारांमध्ये आज या विक्रमासाठी टशन
–विराट, रोहितसह जगातील कोणत्याच दिग्गजाला जमलं नाही ते फिंचने आज करुन दाखवलं
–त्याची विराटसोबत खेळण्याची हुकलेली संधी आता पुर्ण होणार