---Advertisement---

इंग्लंडला ‘सळो की पळो’ करुन सोडणारा क्रिकेटर नाही भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये, कर्णधारासहित इंग्लिंश संघ झालाय आनंदी

---Advertisement---

नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर इंग्लंडविरुद्ध झालेल्या टी-२० मालिकेत ३-२ ने विजय संपादन केल्यानंतर भारतासमोर आता वनडे मालिकेचे आव्हान असणार आहे. या मालिकेतील सामने २३, २६ आणि २८ मार्च रोजी पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडियमवर पार पडणार आहेत. परंतु भारतीय संघातील पहिल्या ११ खेळाडूंमध्ये एक खेळाडू नाही, ज्याने इंग्लिश संघाविरुद्ध धुमाकूळ घातला होता.

भारतीय संघाला या मालिकेत विजयाचे प्रबळ दावेदार मानले जात आहे. कारण भारतीय संघाने इंग्लंड संघाविरुद्ध मायदेशात एकूण ४८ वनडे सामने खेळले आहेत. यात भारतीय संघाला ३१ तर इंग्लंड संघाला अवघे १६ सामने जिंकण्यात यश आले आहे. यातील एक सामना अनिर्णित राहिला होता. असे असले तरीही, इंग्लंड संघ भारताला वनडेत काट्याची टक्कर देण्याच्या प्रयत्नात असेल.

अशात भारताचा अष्टपैलू रवींद्र जडेजा या मालिकेत भारतीय संघाचा भाग नाही. जडेजाने यापुर्वी इंग्लंड संघाविरुद्ध गोलंदाजी आणि फलंदाजीमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली होती.

त्याने इंग्लंड संघाविरुद्ध मायदेशात खेळलेल्या एकूण १३ वनडे सामन्यात ४०.१६ च्या सरासरीने तब्बल २४१ धावा केल्या आहेत. यात नाबाद ६१ धावा ही त्याची सर्वोत्तम खेळी राहिली आहे. यासोबतच त्याने गोलंदाजी करताना २४ गडी देखील बाद केले आहेत. त्यामुळे जडेजा भारतीय संघात नसल्याने इंग्लिश संघाला नक्कीच फायद्याचे ठरणार आहे.

जडेजा ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या कसोटी मालिकेतून अंगठ्याच्या दुखापतीमुळे संघाबाहेर झाला होता. त्यानंतर त्याच्या अंगठ्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. काही महिने मैदानाबाहेर राहिल्यानंतर तो आता मैदानात सरावासाठी उतरला आहे. इंग्लंड विरुद्ध झालेल्या कसोटी आणि टी -२० मालिकेत त्याला स्थान देण्यात आले नव्हते. तसेच आजपासून (२३ मार्च) सुरू होणाऱ्या वनडे मालिकेत देखील त्याला स्थान देण्यात आले नाही. तो ९ एप्रिलपासून सुरु होणाऱ्या आयपीएल २०२१ च्या हंगामात चेन्नई सुपर किंग्स संघाकडून मैदानात पुनरागमन करणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

मोठी बातमी! इंग्लंडविरुद्ध कृणाल पंड्यासह ‘या’ भारतीय खेळाडूने केले वनडे पदार्पण

तिसरा डोळा! आजपासून सुरु होणाऱ्या वनडे मालिकेत ‘या’ खेळाडूंच्या कामगिरीवर असणार सर्वांचेच लक्ष

तब्बल ६१८ दिवसांनंतर एकहाती सामना जिंकून देणारा ‘हा’ खेळाडू करतोय वनडे कमबॅक, भारताला भरवणार धडकी!

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---