भारत विरुद्ध इंग्लंड 5 सामन्यांची टी20 मालिका 22 जानेवारीपासून सुरू होणार आहे. मालिकेतील पहिला सामना कोलकात्यातील ईडन गार्डन्स मैदानावर खेळवला जाणार आहे. याआधी दोन्ही संघ कोलकत्यात पोहोचले आहेत. रविवारी भारतीय संघाने पहिल्या सराव सत्रात घाम गाळला असताना, जोस बटलरच्या नेतृत्वाखालील इंग्लंड संघाने विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला. या टी20 मालिकेत कामगिरी करून काही भारतीय खेळाडू चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम इलेव्हनमध्ये आपले स्थान पक्के करण्याचा प्रयत्न करतील. तर, काही खेळाडूंना पदार्पणाची संधी मिळू शकते. भारत विरुद्ध इंग्लंड टी20 मालिकेशी संबंधित काही महत्त्वाच्या माहितीवर एक नजर टाकूया-
भारत विरुद्ध इंग्लंड टी20 वेळापत्रक-
22 जानेवारी – पहिला टी20, कोलकाता (भारतीय वेळेनुसार सायंकाळी 7 वाजता)
25 जानेवारी – दुसरा टी20, चेन्नई (भारतीय वेळेनुसार सायंकाळी 7 वाजता)
28 जानेवारी – तिसरा टी20, राजकोट(भारतीय वेळेनुसार सायंकाळी 7 वाजता)
31 जानेवारी – चौथा टी20, पुणे (भारतीय वेळेनुसार सायंकाळी 7 वाजता)
2 फेब्रुवारी – पाचवा टी20, मुंबई (भारतीय वेळेनुसार सायंकाळी 7 वाजता)
भारत विरुद्ध इंग्लंड मालिकेतील सर्व टी20 सामने भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता सुरू होईल, तर दोन्ही कर्णधार अर्धा तास आधी म्हणजे संध्याकाळी 6.30 वाजता टॉससाठी मैदानात उतरतील. भारत विरुद्ध इंग्लंड पहिला टी20 सामना भारतीय चाहते स्टार स्पोर्ट्सच्या विविध नेटवर्कवर लाईव्ह पाहू शकतात. याशिवाय तुम्ही डिस्ने प्लस हॉटस्टार अॅप आणि वेबसाइटवर भारत विरुद्ध इंग्लंड टी20 मालिकेचे लाईव्ह स्ट्रीमिंग पाहू शकता.
भारत विरुद्ध इंग्लंड टी20 मालिकेसाठी दोन्ही संघ-
भारत: सूर्यकुमार यादव (कर्णधार), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, रिंकू सिंग, नितीश कुमार रेड्डी, अक्षर पटेल (उपकर्णधार), हर्षित राणा, अर्शदीप सिंग, मोहम्मद शमी, वरुण चक्रवर्ती, रवी बिश्नोई, वॉशिंग्टन सुंदर, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक)
इंग्लंड: जोस बटलर (कर्णधार), रेहान अहमद, जोफ्रा आर्चर, गस अॅटकिन्सन, जेकब बेथेल, हॅरी ब्रूक, ब्रायडन कार्स, बेन डकेट, जेमी ओव्हरटन, जेमी स्मिथ, लियाम लिव्हिंगस्टोन
हेही वाचा-
मोहम्मद शमी पूर्णपणे तंदुरुस्त? सरावादरम्यान गुडघ्याला बांधली पट्टी; पाहा VIDEO
‘आम्ही आमचे सर्वोतपरी…’, कॅप्टन रोहित शर्माने घेतला चॅम्पियन्स ट्राॅफी भारतात आणण्याचा निर्धार!
IPL 2025: LSG लवकरच जाहीर करणार आपला कर्णधार, स्टार खेळाडूचे नाव शर्यतीत सर्वात पुढे