अहमदाबाद। शुक्रवारपासून (१४ मार्च) भारत विरुद्ध इंग्लंड संघात ५ सामन्यांची टी२० मालिका सुरु होत आहे. यावर्षी भारतात टी२० विश्वचषक होणार आहे. त्यादृष्टीने ही मालिकाही महत्त्वाची आहे. त्यातच टी२०मधील अव्वल दोन संघात ही मालिका होत असल्याने सर्वांना ही मालिका रोमांचक होईल अशी अपेक्षा आहे.
या मालिकेतील सामने अनुक्रमे १२, १४,१६,१८ आणि २० मार्च रोजी होणार आहेत. हे सर्व सामने अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहेत. ही मालिका सुरु होण्याआधी भारत आणि इंग्लंड यांच्यातील टी२० सामन्यांचा इतिहास जाणून घेऊ.
तुल्यबळ संघ
आंतरराष्ट्रीय टी२०मध्ये भारत आणि इंग्लंड संघ सर्वात पहिल्यांदा २००७ सालच्या टी२० विश्वचषकात आमने-सामने आले होते. त्या सामन्यात भारताने १८ धावांनी विजय मिळवला होता. तेव्हापासून भारत आणि इंग्लंडने एकमेकांविरुद्ध आत्तापर्यंत एकूण १४ टी२० सामने खेळले आहेत. यातील ७ सामने भारताने जिंकले आहेत, तर ७ सामने इंग्लंडने जिंकले आहेत.
तसेच या १४ सामन्यांपैकी ६ सामने भारतात झाले आहेत. या ६ सामन्यांपैकी ३ सामने भारताने जिंकले आहेत, तर ३ सामने इंग्लंडने जिंकले आहेत. त्यामुळे ही आकडेवारी पाहाता दोन्ही संघ तुल्यबळ असल्याचे लक्षात येते.
तसेच आत्तापर्यंत भारत आणि इंग्लंड संघात भारतात ३ द्विपक्षीय मालिका झाल्या आहेत. त्यातील १ मालिका भारताने, १ मालिका इंग्लंडने जिंकली आहे. तर १ मालिका बरोबरीत सुटली आहे.
खेळाडूंची कामगिरी
भारत आणि इंग्लंड यांच्यात झालेल्या टी२० सामन्यांमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम भारताचा कर्णधार विराट कोहलीच्या नावावर आहे. त्याने इंग्लंड विरुद्ध १२ टी२० सामन्यात ३४६ धावा केल्या आहेत. तर दुसऱ्या क्रमांकावर इंग्लंडचा कर्णधार ओएन मॉर्गन आहे. मॉर्गनने भारताविरुद्ध ११ टी२० सामन्यात ३१४ धावा केल्या आहेत.
त्याचबरोबर भारत आणि इंग्लंड यांच्यात झालेल्या टी२० सामन्यांमध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम युजवेंद्र चहलच्या नावावर आहे. चहलने इंग्लंडविरुद्ध ६ सामन्यात ९ विकेट्स घेतल्या आहेत. तर त्याच्यापाठोपाठ हरभजन सिंग आहे. त्याने ८ विकेट्स घेतल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
रवी शास्त्रींना आली ‘३६’च्या आकड्याची आठवण, ट्विट करत म्हणाले…
गुरु तो गुरुच!! रहाणेच्या प्रशिक्षकांमुळे पृथ्वी शॉला गवसला फॉर्म, अवघ्या ५ दिवसांत केल्या सुधारणा
केवळ २६ धावा अन् रोहित ठरणार ‘हा’ विक्रम करणारा विराटनंतरचा दुसराच भारतीय