शनिवारी (२१ जुलै) भारत-इंग्लंड यांच्यात महिला हॉकी विश्वचषकात ब गटातील पहिला सामना झाला.
ऑलिंपिक वेजेत्या इंग्लंड संघाला हा सामना १-१ असा बरोबरीत सोडवण्यात यश आले.
तब्बल ८ वर्षानंतर विश्वचषकात पुनरागमन करणाऱ्या भारतीय संघाने या सामन्याची आक्रमक सुरवात केली होती.
सामन्याच्या २५ व्या मिनिटाला नेहा गोयलने गोल करत भारताला १-० अशी आघाडी मिळवून दिली होती.
त्यानंतर भारतीय संघाने उत्कृष्ट खेळ करत ५५ व्या मिनिटापर्यंत इंग्लंडला गोल करु दिला नाही.
मात्र ५६ व्या मिनिटाला लिली ओस्लीने गोल करत इंग्लंडला सामन्यात बरोबरी साधून दिली.
भारतीय संघाने या सामन्यात विजयाची संधी दवडली. मात्र इंग्लंडने या सामन्यात आपला पराभव टाळण्यात यश मिळवले.
विश्वचषकाच्या ब गटातील हा सलामीचा सामना पूर्णवेळेत १-१ असा बरोबरीत सुटला.
महत्त्वाच्या बातम्या-
-भुवनेश्वर कुमार संघात नसल्याने भारताला मोठा फटका बसणार- सचिन तेंडुलकर
-फलंदाजांच्या कामगिरीवर अवलंबून आहे भारताचे यश- सौरव गांगुली