आयर्लंड विरुद्ध भारत संंघातील 3 सामन्यांच्या टी20 मालिकेतील तिसरा म्हणजेच, अखेरचा सामना बुधवारी (दि. 23 ऑगस्ट) खेळला जाणार आहे. हा सामना डब्लिन येथील द व्हिलेज मैदानावर खेळला जाणार आहे. या सामन्याला भारतीय प्रमाणवेळेनुसार सायंकाळी 7.30 वाजता सुरुवात होणार आहे. वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ पहिले दोन सामने जिंकत या मालिकेत 2-0ने आघाडीवर आहे. अशात तिसरा सामनाही जिंकून भारतीय संघ आयर्लंडचा सुफडा साफ करण्याचा प्रयत्न करेल. चला तर, तिसऱ्या टी20 सामन्याविषयी जाणून घेऊयात…
कशी असेल डब्लिनची खेळपट्टी
डब्लिन (Dublin) येथील द व्हिलेज (The Village) मैदानावर मालिकेतील तिन्ही सामने खेळले जात आहेत. पहिल्या दोन सामन्यात या खेळपट्टीवर फलंदाजांचे राज्य पाहायला मिळाले. येथील बाऊंड्री लाईन छोटी असल्याने धावा बनवणे सोपे आहे. या खेळपट्टीवर पहिल्या डावातील सरासरी धावसंख्या 170 राहिली आहे. अशात हे जास्त धावसंख्या उभारण्याची खेळपट्टी आहे. मैदानाच्या आकडेवारीबद्दल बोलायचं झालं, तर येथे नाणेफेक जिंकणारा संघ अधिकतर क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेऊन विजय मिळवतो. अशात तिसऱ्या टी20त दोन्ही नाणेफेक जिंकणारा कर्णधार काय निर्णय घेतो, हे पाहणे रंजक ठरेल.
आमने-सामने आकडेवारी
भारत विरुद्ध आयर्लंड (India vs Ireland) संघातील टी20 आकडेवारी पाहायची झाली, तर यामध्ये भारताचे पारडे पूर्णपणे जड असल्याचे दिसते. उभय संघात आतापर्यंत 7 टी20 सामने खेळले गेले आहेत. यातील सर्वच्या सर्व सामने भारतीय संघानेच जिंकले आहेत.
पाऊस बिघडवणार का खेळाचा रोमांच?
वृत्तांनुसार, डब्लिनमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या सामन्यात पावसाने घोळ घातला होता. त्यामुळे सामन्याचा निकाल डकवर्थ लुईस नियमानुसार लावण्यात आला. भारत हा सामना 2 धावांनी जिंकलेला. दुसऱ्या सामन्यात पावसाने व्यत्यय आणला नव्हता. आता तिसऱ्या सामन्यात पावसाची शक्यता वर्तवली जात आहे. जर पाऊस झाला, तर सामना उशिरा सुरू होऊ शकतो. तसेच, जास्त पाऊस आला, तर डकवर्थ लुईस नियमाचा वापरही केला जाऊ शकतो.
कुठे पाहायचा लाईव्ह सामना?
आयर्लंड विरुद्ध भारत (Ireland vs India) संघातील तिसरा टी20 सामना स्पोर्ट्स 18वर लाईव्ह पाहता येईल. तसेच, सामन्याची लाईव्ह स्ट्रीमिंग जिओ सिनेमावर पाहता येईल.
टी20 मालिकेसाठी उभय संघ
आयर्लंड
रॉस एडेअर, अँडी बालबर्नी, हॅरी टेक्टर, पॉल स्टर्लिंग (कर्णधार), फिओन हँड, थिओ व्हॅन वोरकोम, बॅरी मॅकार्थी, मार्क एडेअर, गॅरेथ डेलेनी, कर्टिस कॅम्फर, लॉर्कन टकर, जोश लिटल, जॉर्ज डॉकरेल, बेन व्हाइट आणि क्रेग यंग.
भारत
जसप्रीत बुमराह (कर्णधार), ऋतुराज गायकवाड (उपकर्णधार), रिंकू सिंग, यशस्वी जयसवाल, तिलक वर्मा, वॉशिंग्टन सुंदर, शिवम दुबे, शाहबाज अहमद, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), आवेश खान, अर्शदीप सिंग, मुकेश कुमार, प्रसिद्ध कृष्णा आणि रवी बिश्नोई. (india vs ireland 3rd t20i match preview dublin pitch report head to head playing read)
हेही वाचा-
काळीज तोडणारी बातमी! दिग्गज अष्टपैलू हरपला, वयाच्या 49व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
“विराट स्वतःला भारी बॉलर समजतो, पण…” भुवीने सांगितला टीम इंडियातील तो किस्सा