भारत विरुद्ध आयर्लंड यांच्यात शुक्रवार, 29 जूनला दुसरा आणि शेवटचा टी-20 सामना होत आहे. या सामन्यात भारतीय संघ विजय मिळवून आयर्लंडला व्हाइट वॉश देण्याच्या तयारीत आहे.
पहिल्या टी-20 सामन्यात भारतीय संघाच्या विजयात शिखर धवन आणि रोहित शर्माने मोलाची भूमिका निभावली होती.
या सामन्यात फॉर्ममध्ये असलेला शिखर धवन आपला सलामी जोडीदार रोहित शर्माचा एक खास विक्रम मोडू शकतो.
अांतरराष्ट्रीय टी-20 कारकिर्दित धवनने 37 सामन्यात 958 धावा केल्या आहेत. धवनला टी-20 सामन्यांमध्ये एक हजार धावा करण्यासाठी फक्त 42 धावांची गरज आहे.
या सामन्यात जर धवनने 42 धावा केल्या तर भारताकडून टी-20 क्रिकेटमध्ये जलद एक हजार धावा करणाऱ्यांच्या यादीत रोहित शर्माला मागे टाकत दुसऱ्या स्थानी विराजमान होईल.
टी-20 क्रिकेटमध्ये भारताकडून जलद एक हजार धावा करणाऱ्यांच्या यादीत पहिल्या स्थानी विराट कोहली आहे. त्याने 27 टी-20 सामन्यात एक हजार धावांचा टप्पा पूर्ण केला होता.
तर दुसऱ्या स्थानी असलेल्या रोहित शर्माला टी-20 मध्ये एक हजार धाव करण्यासाठी 40 सामने लागले होते.
आजपर्यंत भारताकडून फक्त पाच खेळाडूंनीच एक हजार किंवा त्यापेक्षा जास्त धावा केल्या आहेत.
हे आहेत एक हजार किंवा त्यापेक्षा जास्त धावा करणारे भारतीय फलंदाज
विराट कोहली- 1983 रन
रोहित शर्मा- 1949 रन
सुरेश रैना- 1509 रन
एम एस धौनी- 1455 रन
युवराज सिंह- 1177 रन
महत्त्वाच्या बातम्या-
-टीम इंडियासाठी टेन्शन वाढवणारी गोष्ट, मोठा खेळाडू करतोय पुनरागमन
-कॅप्टन कूल धोनीच्या नावावर जगातील सर्वात कूल विक्रम!