नॉटींगघम। इंग्लंड विरुद्ध भारत संघात ट्रेंटब्रिज मैदानावर सुरु असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात भारताने बुधवारी (२२ आॅगस्ट) इंग्लंडवर २०३ धावांनी विजय मिळवला.
मंगळवारी हा सामना ९ बाद ३११ चौथ्या दिवसाखेर थांबविण्यात आला होता. त्यामुळे केवळ १ विकेटसाठी आज दोन्ही संघांना मैदानात यावे लागले होते.
चौथ्या दिवसाखेर अदिल राशिद ५०चेंडूत ३३ तर जेम्स अॅंडरसन १६ चेंडूत ८ धावांवर खेळत होते.
आज तिसऱ्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर आर अश्विनच्या गोलंदाजीवर रहाणेकडे झेल देत जेम्स अॅंडरसन बाद झाला.
कालच्या ९ बाद ३११ धावसंख्येत केवळ ६ धावांची भर घालुन इंग्लंड संघ सर्वबाद झाला.
भारताकडून या डावात जसप्रीत बुमराहने ५, इशांत शर्माने २ तर हार्दिक पंड्य, आर अश्विन आणि मोहम्मद शमीने प्रत्येकी एक विकेट घेतली.
संक्षिप्त धावफलक:
भारत पहिला डाव- सर्वबाद ३२९ धावा
इंग्लंड पहिला डाव – सर्वबाद १६१ धावा
भारत दुसरा डाव – ७बाद ३५२धावा (घोषित)
इंग्लंड दुसरा डाव – सर्वबाद ३१७ धावा
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या:
–इंग्लड विरुद्ध भारत संघातील तिसऱ्या कसोटीत झाला हा खास विक्रम
–केरळच्या महापूरात कुटुंब अडकल्यानंतरही भारताच्या या जलतरणपटूची एशियन गेम्समध्ये चमकदार कामगिरी
–सर्व प्रश्नांचं उत्तर केवळ काळ देतो, रुट-कोहलीची ही आकडेवारी पाहुन कळेल नक्की कसे?