---Advertisement---

चौथा टी२० सामना जिंकल्यानंतरही टीम इंडियाला आयसीसीने सुनावली शिक्षा, जाणून घ्या कारण

On: रविवार, फेब्रुवारी 2, 2020 3:35 PM
---Advertisement---

शुक्रवारी (31 जानेवारी) वेलिंग्टन (Wellington) येथे भारताने न्यूझीलंडला (India vs New Zealand) 5 सामन्यांच्या टी20 मालिकेतील चौथ्या सामन्यात सुपर ओव्हरमध्ये पराभूत केले. त्याचबरोबर या मालिकेत 4-0ने विजयी आघाडी घेतली. आज सुरु असलेल्या पाचव्या टी20 सामन्यात भारत न्यूझीलंडचा व्हाईट वॉश करण्याचा प्रयत्न करेल.

परंतु चौथ्या सामन्यानंतर भारतीय संघावर षटकांची गती कमी राखल्याने दंड आकारण्यात आला आहे. स्काय स्टेडियमवर (Sky Stadium) खेळलेल्या या सामन्यात भारतीय संघाला निर्धारित वेळेत षटके पूर्ण न केल्याबद्दल दंड ठोठावण्यात आला आहे. यामध्ये सामना शुल्काच्या 40 टक्के दंड आकारण्यात आला आहे.

झाले असे की, भारतीय संघाने निर्धारित वेळेत 2 षटके कमी टाकल्यामुळे संघावर प्रत्येकी 1 षटकासाठी 20 टक्के दंड या हिशोबाने 40 टक्के दंड ठोठावण्यात आला.

“यावेळी सामन्यानंतर भारताचा कर्णधार विराट कोहलीने आपली चूक कबूल करत आयसीसीने दिलेली शिक्षा मान्य केली आहे. या सामन्यात मैदानावर उपस्थित पंच ख्रिस ब्राउन (Chris Brown), शॉन हेग (Shaun Haig) आणि तिसरे पंच (थर्ड अंपायर) ऍश्ले मेहरोत्रा (Ashley Mehrotra) यांनी भारतीय संघावर षटकांची गती कमी राखल्याचा आरोप केला होता,” असे आयसीसीने आपल्या अहवालात म्हटले आहे.

आयसीसी आचार संहितेच्या कलम 2.22 नुसार सामनाधिकारी ख्रिस ब्रॉड (Chris Broad) यांना भारतीय संघ दोषी आढळला. त्यामुळे भारतीय संघावर सामना शुल्काच्या 40 टक्के रकमेचा दंड ठोठावला.

या कलमानुसार जेव्हा कोणताही संघ निर्धारित वेळेत षटके पूर्ण करत नाही तेव्हा खेळाडूंवर प्रत्येकी 1 षटकानुसार 20 टक्के दंड आकारण्यात येतो.

https://twitter.com/Maha_Sports/status/1223868365829132288

https://twitter.com/Maha_Sports/status/1223865855043178496

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---