आज (2 फेब्रुवारी) बे ओव्हल (Bay Oval), माउंट माउंगानुई (Mount Maunganui) येथे भारत विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) संघात 5 सामन्याच्या टी20 मालिकेतील अंतिम सामना (Last Match Of 5 Matches T20 Series) पार पडणार आहे. या मालिकेत भारताने 4 सामने जिंकले आहेत. तसेच आजच्या सामन्यात न्यूझीलंडचा व्हाईटवॉश करत भारताला एक नवा विक्रम (Record) करण्याची संधी आहे.
जर भारताने आजचा टी20 सामना जिंकला तर 5 सामन्यांच्या द्विपक्षीय टी20 मालिकेतील सर्व सामने जिंकणारा भारत हा पहिला संघ बनेल.
न्यूझीलंडने आत्तापर्यंत त्यांच्या मायदेशात 3 किंवा त्यापेक्षा अधिक सामन्यांच्या द्विपक्षीय मालिकेतील सर्व सामने गमावलेले नाही. त्यामुळे त्यांना हा विक्रम अबाधित ठेवण्यासाठी आजच्या सामन्यात विजय गरजेचा आहे.






