---Advertisement---

फक्त नि फक्त एका विकेटमुळे हुकला भारताचा न्यूझीलंडवरील विजय, यापूर्वीही ओढावलीय अशी दुर्देवी वेळ

On: सोमवार, नोव्हेंबर 29, 2021 6:00 PM
Team-India
---Advertisement---

कानपूर| सोमवार रोजी (२९ नोव्हेंबर) भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात ग्रीन पार्क स्टेडियम येथे पहिला कसोटी सामना झाला. धाकधूक वाढवलेल्या या सामन्याचा नाट्यमय अखेर झाला आणि शेवटी हा सामना अनिर्णीत राहिला. सामन्याच्या सुरुवातीपासूनच फलंदाजी, गोलंदाजी अन् क्षेत्ररक्षणात दमदार प्रदर्शन करणाऱ्या भारताला केवळ एका विकेटमुळे हा सामना जिंकता आला नाही.

न्यूझीलंडकडून रचिन रविंद्र आणि एजाज पटेल यांनी पाचव्या दिवसाखेर चिवट झुंज दिली. तसेच खराब प्रकाशाच्या अडथळ्यामुळेही लवकरच दिवसाचा खेळ संपवण्यात आला. परिणामी विजयाच्या जवळ जाऊनही भारताला त्याची चव चाखता आली नाही.

भारतीय संघावर ही दुर्देवी वेळ ओढावण्याची पहिलीच वेळ नाहीय. यापूर्वीही २ वेळा भारतीय संघाला अशा पराभवाला सामोरे जावे लागले होते. १९७८-१९ साली पहिल्यांदा भारतीय संघाला फक्त एका विकेटमुळे सामना विजयापासून वंचित राहावे लागले होते. कोलकाता येथे वेस्ट इंडिजविरुद्ध ही कसोटी लढत रंगली होती. ज्यामध्ये ३३५ धावांचा बचाव करताना १९७ धावांवर ९ विकेट्स काढल्यानंतरही फक्त एका विकेटमुळे हा सामना अनिर्णीत राहिला होता.

त्यानंतर वर्ष २००६ मध्ये वेस्ट इंडिज संघाविरुद्ध दुसऱ्यांदा भारताच्या तोंडून विजयाचा घास पळाला होता. हा सामना सेंट जॉन्स स्टेडियमवर झाला होता. या सामन्यानंतर आता तब्बल ११ वर्षांनी भारतीय संघावर ही दुर्देवी वेळ ओढावली आहे.

असा झाला सामना
दरम्यान सामन्याबाबत बोलायचे झाल्यास, भारतीय संघाने या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना ३४५ धावांचा डोंगर उभारला होता. भारताकडून या डावात पदार्पणवीर श्रेयस अय्यरने १०५ धावांची मोठी खेळी केली होती. तसेच सलामीवीर शुबमन गिल आणि रविंद्र जडेजा यांनी अर्धशतक झळकावली होती. या डावाता न्यूझीलंडकडून टीम साउदीने सर्वाधिक ५ विकेट्स घेतल्या होत्या.

भारताच्या या धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंडचा संघ २९६ धावांवरच गारद होता. न्यूझीलंडकडून केवळ त्यांचे सलामीवीर टॉम लॅथम (९५ धावा) आणि विल यंग (८९ धावा) अर्धशतके करू शकले होते. भारताकडून या डावात अक्षर पटेलने विकेट्सचा पंचक घेतला होता. अशाप्रकारे भारताने पहिल्या डावात ४९ धावांची आघाडी घेतली होती.

या ४९ धावांच्या आघाडीमध्ये २३४ धावांची भर घालत भारताने न्यूझीलंडला विजयासाठी २८५ धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडचा संघ पाचव्या दिवसाखेर १६५ धावाच करू शकला. परंतु पाचव्या दिवसाअंती त्यांचा दहावा खेळाडू नाबाद राहिल्याने सामना अनिर्णीत राहिला.

महत्त्वाच्या बातम्या-

विक्रमी अश्विन! लॅथमची विकेट घेताच ठरला भारताचा तिसरा यशस्वी कसोटी गोलंदाज, हरभजनला पछाडलं

कानपूर कसोटीत अश्विनने मोडला हरभजनचा ‘महाविक्रम’, मातब्बर फिरकीपटूने असे काही करत जिंकली मने

आयपीएल २०२२ स्पर्धेसाठी मुंबई इंडियन्स संघ ‘या’ खेळाडूंना करणार रिटेन?

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---