---Advertisement---

प्रजासत्ताक दिनी अर्धशतकी खेळी करणाऱ्या रोहित शर्माचा अनोखा पराक्रम

On: शनिवार, जानेवारी 26, 2019 4:10 PM
---Advertisement---

माऊंट मॉनगनुई। भारताने आज (26 जानेवारी) बे ओव्हल मैदानावर झालेल्या दुसऱ्या वन-डे सामन्यात न्यूझीलंडवर 90 धावांनी विजय मिळवला आहे. यामुळे भारत 5 सामन्यांच्या वन-डे मालिकेत 2-0ने आघाडीवर आहे.

26 जानेवारी म्हणजेच भारताचा प्रजासत्ताक दिन असल्याने तो रोहित शर्मासाठी विशेष ठरला आहे. कारण या दिवशी वनडेत सामनावीराचा पुरस्कार मिळवणारा तो पहिलाच भारतीय खेळाडू ठरला आहे.

या सामन्यात रोहितने 96 चेंडूत 87 धावा केल्या. त्याने या खेळीत 9 चौकार आणि 3 षटकार मारले.

त्याचबरोबर रोहित न्यूझीलंडमध्ये वनडेत सर्वाधिक षटकार मारणाऱ्या भारतीय फलंदाजांच्या यादीत विरेंद्र सेहवागसह संयुक्तरित्या अव्वल क्रमांकावर आला आहे. या दोघांनीही न्यूझीलंड विरुद्ध प्रत्येकी 16 षटकार मारले आहेत.

रोहितने शिखर धवनसोबत धडाकेबाज फलंदाजी करत भारताला चांगली सुरूवात करून दिली होती. या जोडीने पहिल्या विकेटसाठी 154 धावांची महत्त्वाची भागीदारीही केली. धवनने 9 चौकारासह 66 धावा केल्या.

महत्त्वाच्या बातम्या-

ये जोडी हैं नंबर 1- हिटमॅन-गब्बर जोडीने मोडला सेहवाग- सचिन जोडीचा विक्रम

आजचा प्रजासत्ताक दिन टीम इंडियासाठी या कारणामुळे ठरला खास

हिटमॅन रोहित शर्माने या दिग्गजांच्या यादीत मिळवले अव्वल स्थान

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment