---Advertisement---

न्यूझीलंडविरुद्ध भारताचा १२ वा खेळाडू मैदानात, ‘या’ कारणामुळे साहाऐवजी केएस भरतला यष्टीरक्षणाची संधी

On: शनिवार, नोव्हेंबर 27, 2021 1:21 PM
R Ashwin and KS Bharat
---Advertisement---

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात सध्या कसोटी मालिकेतील पहिला सामना खेळला जात आहे. पहिला सामना गुरुवारपासून (२५ नोव्हेंबर) कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियावर खेळला जात आहे.  सामन्याच्या तिसऱ्या दिवशी भारतीय संघाला एक वाईट बातमी मिळाली. भारताचा अनुभवी यष्टीरक्षक फलंदाज वृद्धिमान साहाच्या मानेला दुखापत झाल्यामुळे मैदानात उतरला नाही. त्याच्या जागी युवा केएस भरतला संघासाठी खेळण्याची संधी मिळाली आहे.

असे असले तीर, केएस भरत आजूनही आंतरराष्ट्रीय पदार्पणासाठी वाट पाहत आहे. साहाला पहिल्या डावात क्षेत्ररक्षणातून माघार घ्यावी लागल्यामुळे बीसीसीआयने याबाबत माहिती दिली आहे. बीसीसीआयने एक ट्वीट करून याबाबत माहिती दिली, ज्यामध्ये लिहिले की, “वृद्धिमान साहाच्या मानेला ताण आला आहे. बीसीसीआयची मेडिकल टीम त्याच्यावर उपचार करत आहे आणि त्याच्या प्रगतीवर लक्ष ठेवून आहे. केएस भरत त्याच्या गैरहजेरीत यष्टीरक्षण करेल.”

साहाने क्षेत्ररक्षणातून माघार घेतली असली तरी, भारताच्या पहिल्या डावात त्याने फलंदाजी केली. त्याने फलंदाजीमध्ये सर्वांनाच निराश केले, तो केवळ एक धाव करून बाद झाला. त्याने टिम साउदीच्या गोलंदाजीवर एक चुकीचा शॉट खेळला आणि टॉम ब्लंडेलच्या हातात झेलबाद झाला.

आता त्याच्या जागी यष्टीरक्षणाची संधी मिळालेला केएस भरत आयपीएलमध्ये २०२० हंगामात विराटच्या नेतृत्वात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरमध्ये खेळला आहे. तसेच त्याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये आंध्र प्रदेश संघाचे नेतृत्व केले आहे. यावर्षी आयपीएलमध्ये भरतचे प्रदर्शन पाहून त्याच्या संघाचा कर्णधार विराट कोहली देखील प्रभावित झाला होता.

आयपीएलमध्ये यावर्षी भरतने शेवटच्या ग्रुप स्टेज सामन्यात दिल्ली कॅपिट्सविरुद्ध आरसीबीला विजय मिळवून दिला होता. त्याने या सामन्याच्या अंतिम क्षणांमध्ये दिल्ली कॅफिट्लसच्या आवेश खानला षटकार मारला होता. यापूर्वी त्याने ७८ प्रथम श्रेणी सामने खेळले आहे आणि त्यामध्ये ४२८३ धावा केल्या आहेत. यामध्ये त्याने एका डावात सर्वाधिक ३०८ धावा केल्या आहेत. तर दुसरीकडे वृद्धिमान सहाचे कसोटी क्रिकेटमधील आलिकडच्या काळातले प्रदर्शन समाधानकार नाही. दरम्यान, भारतीय संघाचा नियमित यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत या कसोटी सामन्यात विश्रांतीवर आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

‘पदार्पणाचे हे दोन दिवस आयुष्यभर माझ्यासोबत राहतील’, श्रेयस अय्यरने शेअर केली भावुक पोस्ट

कोरोना विषाणूचा नवीन व्हेरियंट आढळल्याने रद्द होणार भारताचा दक्षिण अफ्रिका दौरा? बीसीसीआयकडून मिळाली माहिती

पहिल्या कसोटीदरम्यान भारतीय पंचांचे निराशाजनक निर्णय, न्यूझीलंडचा सलामीवीर तीन वेळा बचावला

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---