जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या अंतिम सामन्यासाठी जगातील सर्व क्रिकेट चाहते उत्सुक आहे. तब्बल २ वर्षांच्या कालावधीनंतर हा अजिंक्यपदाचा अंतिम सामना खेळवला जाणार आहे. हा सामना भारत आणि न्यूझीलंडमध्ये १८-२२ जून दरम्यान खेळवला जाणार आहे. दोन्ही संघ पहिल्यावहिल्या जागतिक कसोटी अजिंक्यपद जिंकण्यासाठी आपले पूर्ण प्रयत्न करतील. या सामन्याचे वैशिष्ट्य म्हणजे हा सामना तटस्थ ठिकाणी खेळवला जाणार आहे. याच निमित्ताने या लेखात आपण भारत आणि न्यूझीलंड संघ जेव्हा आयसीसी स्पर्धांमध्ये तटस्थ ठिकाणी सामने खेळले आहेत, त्या सामन्यांच्या आकडेवारीचा आढावा घेऊया.
टी२० आणि एकदिवसीय सामने मिळून एकूण सात वेळेस भारत आणि न्यूझीलंड संघ तटस्थ ठिकाणी सामने खेळले आहे. या सात सामन्यात भारतीय संघाचे प्रदर्शन खूप वाईट राहिले आहे. तटस्थ ठिकाणी सामना खेळताना न्यूझीलंड संघाने आतापर्यंत भारतीय संघाचा ६ वेळेस पराभव केला आहे. भारतीय संघाला केवळ एकच सामना जिंकण्यात यश आले आहे. साउथॅम्प्टनमधील ‘द एजेस बाउल’ मैदान हे ही एक तटस्थ ठिकाण आहे. त्यामुळे भारतीय संघाला पुन्हा तटस्थ ठिकाणांवरील इतिहास बदलायचा असेल, तर अंतिम सामन्यात दमदार कामगिरी करावी लागेल.
भारत आणि न्यूझीलंड संघांचा आयसीसी स्पर्धांमधील इतिहास-
१) १९७५ विश्वचषक- पहिल्यांदा भारत आणि न्यूझीलंडसंघ ५० षटकाच्या विश्वचषकात आमनेसामने आले होते. हा विश्वचषक इंग्लडमध्ये खेळवला गेला होता. या सामन्यात न्यूझीलंड संघाने भारतीय संघावर ४ विकेट्सने विजय मिळवला होता.
२) १९७३ विश्वचषक- या विश्वचषक स्पर्धेदरम्यान न्यूझीलंडने पुन्हा एकदा भारतावर विजय मिळवला. इंग्लंडमध्ये खेळल्या गेलेल्या या विश्वचषकात भारताला आठ विकेट्सने पराभवाला सामोरे जावे लागले.
३) १९९९ विश्वचष – इंग्लंडमध्ये १९९९चा विश्वचषक खेळला गेला होता. भारत आणि न्यूझीलंड सामन्यात न्यूझीलंड संघाने भारतावर ५ विकेट्सने विजय मिळवला होता .
४) २००० चॅम्पियन्स ट्रॉफी- भारत आणि न्यूझीलंडचे संघ या स्पर्धेत अंतिम सामन्यात पोहोचले होते. अंतिम सामन्यात न्यूझीलंड संघाने भारतीय संघावर ४ विकेट्सने विजय मिळवला.
५) २००३ विश्वचषक- दक्षिण आफ्रिकेत खेळल्या गेलेल्या विश्वचषक स्पर्धेदरम्यान भारताला पहिल्यांदाच न्यूझीलंड संघाला तटस्थ ठिकाणी ठरवण्यात यश आले होते. सेंच्युरियनमध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यात भारतीय संघाने सात गडी राखून विजय मिळवला.
६) २००७ टी२० विश्वचषक- दक्षिण आफ्रिकेत हा पहिलावहिला टी२० विश्वचषक खेळवला गेला होता. या सामन्यातही भारतीय संघाला पराभव स्वीकारावा लागला. जोहान्सबर्गमध्ये झालेल्या या सामन्यात न्यूझीलंड संघाने १० धावांनी भारताचा पराभव केला.
७) २०१९ विश्वचषक- इंग्लंडमध्ये खेळवल्या गेलेल्या या विश्वचषक स्पर्धेत भारत आणि न्यूझीलंड संघ हे उपांत्य फेरीत आमनेसामने होते. या सामन्यात भारतीय संघाला १८ धावांनी पराभव स्वीकारावा लागला.
महत्वाच्या बातम्या
पदार्पणाच्या सामन्यातच चमकली ‘ही’ भारतीय फिरकीपटू, दिवंगत वडिलांना समर्पित केली कामगिरी
‘ही’ गोष्ट केली तर भारताकडून टी२० विश्वचषकात नक्कीच खेळणार, कुलदीप यादवने व्यक्त केला विश्वास
कसोटी विशेषज्ञ मार्नस लॅब्यूशेनची टी२० स्पर्धेत कमाल; मिळू शकते आयपीएल अन् विश्वचषकात संधी