भारत विरुद्ध न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये २ कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला कसोटी सामना कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर पार पडला होता. या सामन्यात रचीन रवींद्र आणि एजाज पटेल यांनी शेवटी अप्रतिम फलंदाजी केली आणि हा सामना अनिर्णीत राखला होता. आता पुढील सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर रंगणार आहे. हा सामना दोन्ही संघांसाठी निर्णायक सामना असणार आहे. चला तर पाहूया कसा राहिला आहे, भारतीय संघाचा वानखेडे स्टेडियमवरचा आतापर्यंतचा इतिहास.
कानपूर कसोटी सामन्यात न्यूझीलंड संघातील गोलंदाजांनी आणि फलंदाजांनी अप्रतिम कामगिरी केली होती. ज्यामुळे हा सामना अनिर्णीत राहिला होता. आता पुढील सामना जिंकून न्यूझीलंड संघाला इतिहास रचण्याची सुवर्णसंधी आहे. कारण पुढील सामना जिंकणारा संघ मालिका आपल्या नावावर करणार आहे. तर विराट कोहलीच्या पुनरागमनामुळे भारतीय संघाची ताकद आणखी वाढणार आहे.
असा आहे वानखेडेच्या मैदानावर भारतीय संघाचा न्यूझीलंड संघाविरुद्धचा इतिहास
भारत आणि न्यूझीलंड हे दोन्ही बलाढ्य संघ आहेत. हे दोन्ही संघ कसोटीत वानखेडेच्या मैदानावर २ वेळेस आमने सामने आले आहेत. या दोन सामन्यांमधील एका सामन्यात भारतीय संघाने बाजी मारली. तर दुसऱ्या कसोटी सामन्यात न्यूझीलंड संघाला विजय मिळवण्यात यश आले आहे. १९७६ मध्ये झालेल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने १६२ धावांनी विजय मिळवला होता. तसेच १९८८ मध्ये झालेल्या सामन्यात न्यूझीलंड संघाने १३६ धावांनी विजय मिळवला होता.
तसेच भारतीय संघाचा वानखेडे स्टेडियवरील इतिहास पाहिला तर, भारतीय संघाने या स्टेडियमवर २५ कसोटी सामने खेळले आहेत. ज्यामध्ये ११ सामन्यात भारतीय संघाला विजय मिळवण्यात यश आले आहे. तर ७ सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. तसेच ७ सामने अनिर्णीत राहिले आहेत. भारतीय संघाने २०१६ मध्ये वानखेडेच्या मैदानावर शेवटचा कसोटी सामना खेळला होता. या सामन्यात भारतीय संघाने इंग्लंड संघाला पराभूत केले होते
महत्त्वाच्या बातम्या-
मेगा लिलावापूर्वी नव्या संघांना ३ खेळाडू विकत घेण्याची मुभा, पण कोणावर किती खर्च करू शकतील टीम?
‘टेनिस बॉल क्रिकेटचा विश्वचषक व्हावा’; विनोद कांबळींनी व्यक्त केली इच्छा
दिल्ली कॅपिटल्सने पृथ्वी शॉला रिटेन केल्याचे पाहून प्रेयसी भलतीच खुश, आनंदाने दिली ‘अशी’ प्रतिक्रिया