आयपीएल २०२२ च्या मेगा लिलावाच्या आधी जुन्या ८ संघांनी त्यांनी रिटेन केलेल्या खेळाडूंची नावं जाहीर केली आहेत. केएल राहुलला पंजाब किंग्सने रिटेन न केल्याने हे स्पष्ट झाले की तो मेगा लिलावाचा भाग असेल. संघांनी रिटेन न केलेल्या खेळाडूंच्या यादीत राहुलसारखे काही दिग्गज खेळाडूदेखील आहेत.
पुढच्या हंगामात २ नवीन संघ म्हणजेच लखनऊ आणि अहमदाबाद आयपीएलच्या ताफ्यात समाविष्ट झालेले आहेत. आणि या २ संघांना आपल्या संघासाठी लिलावाआधी ३ खेळाडू घेण्याची संधी देण्यात आली आहे. त्यामुळेच बाकी संघांनी रिटेन न केलेल्या खेळाडूंसाठी ही उत्कृष्ट संधी आहे.
परंतु त्यांना लिलावाआधी ३ च खेळाडू घेता येणार आहेत, ज्यात २ भारतीय आणि १ विदेशी खेळाडूचा समावेश असेल. बीसीसीआयने रिटेन करणाऱ्या खेळाडूंची किंमत आधीच ठरवली होती. तसेच नवीन संघांना देखील तीच किंमत मोजावी लागेल. जर एखादा संघ ३ खेळाडू घेत असेल, तर पहिल्या खेळाडूला १५ कोटी, दुसऱ्या खेळाडूला ११ कोटी तर तिसऱ्या खेळाडूला ७ कोटी देण्यात येतील.
दोन्ही नवीन संघाच्या अर्थात अहमदाबाद आणि लखनऊ संघांच्या सीईओने असे म्हटले की, “जसा करार होईल तसंच वाटप केलेल्या रकमेनुसार निर्णय येईल. जर खेळाडू कर्णधारपद स्वीकारत असेल तर त्याला सर्वाधिक १५ कोटी देण्यात येतील.”
लखनऊ संघाचा कर्णधार असणार केएल राहुल?
रिटेंशनच्या आधीपासून असं बोलण्यात येत होतं की, केएल राहुल पुढील हंगामात लखनऊ संघाचं नेतृत्व करताना दिसेल आणि हे स्पष्टही झालं, जेव्हा पंजाब किंग्सने केएल राहुलला आपल्या संघात रिटेन केलं नाही. त्यासोबत सनरायझर्स हैदराबादकडून खेळणारा फिरकीपटू गोलंदाज राशिद खान देखील पुढील हंगामात नव्या संघाकडून खेळताना दिसेल.
२ नव्या संघांना २५ डिसेंबरपर्यंत ३ खेळाडूंच्या नावाची यादी जाहीर करायची आहे. त्यानंतर पुढील हंगामासाठी मेगा लिलाव होईल जो कि, जानेवारी २०२२ च्या सुरवातीला होऊ शकतो.
महत्त्वाच्या बातम्या-
‘टेनिस बॉल क्रिकेटचा विश्वचषक व्हावा’; विनोद कांबळींनी व्यक्त केली इच्छा
दिल्ली कॅपिटल्सने पृथ्वी शॉला रिटेन केल्याचे पाहून प्रेयसी भलतीच खुश, आनंदाने दिली ‘अशी’ प्रतिक्रिया
अल्टिमेट कराटे लीगमध्ये पुणे डिव्हाईनचा संघ ‘विनिंग किक’ मारून विजेतेपद पटवण्यासाठी सज्ज