भारताला 15व्या आशिया चषकामध्ये (Asia Cup) सुपर फोरच्या पहिल्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. दुबईमध्ये झालेल्या या सामन्यात पाकिस्तानने भारताला 5 विकेट्सने पराभूत केले. यावेळी भारताचा अनुभवी फलंदाज विराट कोहली याने अर्धशतक केले. यामुळे त्याने फॉर्ममध्ये परतताच सलग दुसऱ्यांदा शतक ठोकले आहे. त्याचबरोबर एक मोठा विक्रमही आपल्या नावावर केला आहे. तसेच हा विक्रम करताना त्याने रोहित शर्मा याला मागे टाकले आहे.
विराटची कमाल बॅटींग
पाकिस्तान विरुद्ध तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करायला उतरलेला विराट कोहली (Virat Kohli) याने जबदस्त कामगिरी केली. त्याने भन्नाट शॉट्स खेळले आहेत. यामुळेच भारत मोठी धावसंख्या उभारू शकला. त्याने 44 चेंडूत 60 धावा केल्या. त्यामध्ये 4 चौकार आणि एका षटकाराचा समावेश आहे. त्याचे हे आंतरराष्ट्रीय टी20मधील 32वे अर्धशतक ठरले आहे. हे अर्धशतक करताच त्याने कर्णधार रोहित शर्मा याला मागे टाकले आहे.
रोहितला टाकले मागे
पाकिस्तान विरुद्धच्या सामन्याआधी रोहित आणि विराट यांनी आंतरराष्ट्रीय टी20मध्ये प्रत्येकी 31-31 अर्धशतके केली होती. पाकिस्तान विरुद्ध 32वे अर्धशतक करताच त्याने रोहितला मागे टाकले आहे. यामुळे तो आतंरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक अर्धशतके करणारा फलंदाज ठरला आहे. तर विराट-रोहित नंतर पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने आतंरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये 27 अर्धशतके केली आहेत.
विराटची आंतरराष्ट्रीय टी20मधील कामगिरी
विराटने 102 आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळले आहेत. त्यामध्ये 50.91च्या सरासरीने 3462 धावा केल्या आहेत. यामध्ये 307 चौकार आणि 98 षटकार मारले आहेत. त्याचबरोबर विराटने पाकिस्तानविरुद्ध टी20 विश्वचषक आणि आशिया चषक स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी केली आहे.
विराट कोहली विरुद्ध पाकिस्तान (आंतरराष्ट्रीय टी20, मोठ्या स्पर्धांमध्ये)
स्पर्धा धावा
2022 आशिया चषक – 60
2022 आशिया चषक – 35
2021 टी20 विश्वचषक – 57
2016 टी20 विश्वचषक – 55*
2016 आशिया चषक – 49
2014 टी20 विश्वचषक – 36*
2012 टी20 विश्वचषक- 78*
सर्वाधिकवेळा 50+ वैयक्तिक धावा करणारे खेळाडू (पुरूष आंतरराष्ट्रीय टी20)
1 विराट कोहली 32
2 रोहित शर्मा 31
3 बाबर आझम 27
4 डेविड वॉर्नर 23
5 मार्टीन गप्टील 22
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
अखेर रिझवानला डावलून नवाजला का दिला गेला सामनावीर पुरस्कार? हे होते कारण
बाबर आझमवर डोके धरायची वेळ! भारताविरुद्धच्या विजयाचा नायक सामन्यानंतर थेट रुग्णालयात
प्रेक्षक बनले दीपक हुड्डाचे चाहते, पाहा पाकिस्तानविरुद्ध मारलेला जबरदस्त अप्पर कट