आशिया चषक 2023 स्पर्धेला गुरवारी (30 ऑगस्ट) झाली आहे. पहिल्याच सामन्यात पाकिस्तान संघाने नेपाळविरुद्ध 238 धावांना मोठा विजय मिळवला. तर दुसऱ्या सामन्यात श्रीलंका संघाने संघातील मोठे खेळाडू नसताना देखिल बांगलादेशला 5 विकेटने पराभूत केले. आता या स्पर्धेतील तिसरा महासाना भारत आणि पाकिस्तान या संघात 2 सप्टेंबरला होणार आहे. त्यात भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज ईशान किशन कोणत्या क्रमांकावर खेळणार आहे हे स्पष्ट झाल्याचे दिसत आहे.
भारीतय संघाने ईशान किशन (Ishan Kishan) यष्टिरक्षक फलंदाज म्हणून संघात ठेवले असून तो पाकिस्तानविरुद्ध सामन्यात खेळणार हे निश्चित आहे. मात्र, ईशान किशन कोणत्या क्रमावर खेळणार याबाबत प्रश्न उपस्थित केले जात होते. पण माध्यमातील वृत्तांकडून दावा करण्यात आला आहे की, ईशान फक्त मधल्या फळीत फलंदाजी करताना दिसणार आहे.
भारीतय संघाच्या युवा खेळाडूने वेस्ट इंडिज दौऱ्यावर सलामीवीर म्हणून तिन्ही वनडे सामन्यात अर्धशतके झळकावली. उत्कृष्ट कामगिरीमुळे ईशानला संघातील स्थान वाचवण्यात यश आले. असे असतानाही संघ व्यवस्थापन टॉप ऑर्डरमध्ये बदल करण्याच्या विचारात नाही. शुभमन गिल आणि रोहित शर्मा भारताची सलामी सांभाळतील, तर विराट कोहली तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना दिसेल. ईशान चौथ्या किंवा पाचव्या क्रमांकावर खेळण्याची संधी दिली जाईल. पाकिस्तान व्यतिरिक्त ईशानला नेपाळविरुद्धच्या प्लेइंग 11 मध्ये समावेश होण्याची खात्री आहे.
भारतीय संघाच्या माहितीनुसार केएल राहुल आशिया चषकात सुरवातीचे दोन सामने खेळणार नाही. भारतीय संघ श्रीलंकेत दाखल झाला असताना राहुल अजूनही एनसीएमध्ये सराव करत आहे. यात भारताने संजू सॅमसनला राखीव खेळाडूच्या रुपात संघात सामिल केले आहे. आता जर राहुल बरा झाला नाही तर तो आशिया चषकातून बाहेर पडू शकतो आणि संघात सॅमसनला संधी देण्यात येईल.
ईशान असणार आहे विश्वचषकाचा भाग
तसेच ईशान हा भारतीय संघाचा विश्वचषक 2023 च्या स्पर्धेचा भाग असल्याचेही स्पष्ट झाले आहे. विश्वचषकासाठी 15 सदस्यीय संघात ईशानला स्थान देण्यात येणार आहे. गरज पडल्यास ईशान बॅकअप ओपनरची भूमिकाही बजावू शकतो. विश्वचषकासाठी भारतीय संघाची घोषणा 4 किंवा 5 सप्टेंबरला होण्याची शक्यता आहे. (india vs pakistan asia cup ishan kishan batting positon in middel order)
महत्वाच्या बातम्या-
नीरजच्या पदरी निराशा! झुरिख डायमंड लीगमध्ये मानावे लागले रौप्य पदकावर समाधान
तारीख आली रे! वर्ल्डकपसाठी ‘या’ दिवशी होणार टीम इंडियाची घोषणा, उरले हाताच्या बोटांवर मोजण्याइतके दिवस