क्रिकेटटॉप बातम्या

तारीख आली रे! वर्ल्डकपसाठी ‘या’ दिवशी होणार टीम इंडियाची घोषणा, उरले हाताच्या बोटांवर मोजण्याइतके दिवस

आगामी वनडे विश्वचषक सुरू होण्यासाठी अवघ्या महिनाभराचाच कालावधी शिल्लक राहिला आहे. पाच ऑक्टोबरपासून भारतातील दहा शहरांमध्ये हा विश्वचषक खेळला जाईल. विश्वचषकासाठी भारतीय संघात कोणत्या खेळाडूंना संधी मिळणार याबाबत सध्या चांगलीच चर्चा सुरू आहे. त्याचवेळी आता भारतीय संघाचे विश्वचषकासाठी संघ निवड 5 सप्टेंबर रोजी केली जाऊ शकते, असे वृत्त येताना दिसते.

विश्वचषकासाठी भारतीय संघ आपली संघ निवड महिनाभर आधीच करण्याची शक्यता असल्याचे वृत्त एका आघाडीच्या वृत्तवाहिनीने दिले. भारतीय संघ सध्या श्रीलंकेत आशिया चषक खेळण्यासाठी पोहोचला आहे. भारतीय संघाचा पहिला सामना 2 सप्टेंबर रोजी पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानसोबत होईल. त्यानंतर दुसरा सामना 4 सप्टेंबर रोजी नेपाळविरुद्ध होणार आहे. या दोन्ही सामन्यातील खेळाडूंच्या कामगिरीवरून भारतीय संघाची निवड होण्याची शक्यता आहे.

आशिया चषकात निवड झालेल्या 17 पैकी पंधरा खेळाडूंना विश्वचषकासाठी निवडले जाऊ शकते. तसेच संजू सॅमसन व अनुभवी फिरकीपटू युजवेंद्र चहल यांची निवड होणार का याकडे सर्वांचे लक्ष आहे. तसेच दुखापतीमुळे आशिया चषकातील पहिल्या दोन सामन्यातून बाहेर झालेला केएल राहुल विश्वचषकासाठी भारतीय संघात असेल का याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत. विश्वचषकात भारतीय संघाचे नेतृत्व रोहित शर्मा करणार हे निश्चित असून, भारताचा पहिला सामना 8 ऑक्टोबर रोजी चेन्नई येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध होईल.

वनडे विश्वचषक 2023 साठी संभाव्य भारतीय संघ –

रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, शुबमन गिल, श्रेयस अय्यर, संजू सॅमसन, ईशान किशन, हार्दिक पांड्या, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल

(BCCI Likely Annouced Squad For ODI World Cup On 5 September)

हेही वाचाच-
लंकन सिहांनी शांत केले बांगला टायगर्स! श्रीलंकेची शानदार विजयाने सुरुवात
IPL फायनलमध्ये CSKचा घाम काढणाऱ्या खेळाडूचा मोठा निर्णय, विदेशी संघासोबत केला ‘एवढ्या’ सामन्यांचा करार

Related Articles