भारत विरुद्ध पाकिस्तान सामना सध्या रोमांचक वळणावर आहे. विशेष म्हणजे भारताने अगदी पहिल्या ओव्हरपासून फटकेबाजी केल्यानंतर सूर्यकुमार यादव अन् विराट कोहली हे दोघे चांगली धावसंख्या उभारतील अशी आशा व्यक्त केली जात होती. मात्र, भारताला मिस्टर 360 सूर्यकुमार यादव अगदी स्वस्तात बाद झाल्याने टीम इंडियावरील दबाव वाढला आहे.
ASIA CUP 2022. WICKET! 9.4: Suryakumar Yadav 13(10) ct Asif Ali b Mohammad Nawaz, India 91/3 https://t.co/Yn2xZGToSl #INDvPAK #AsiaCup2022
— BCCI (@BCCI) September 4, 2022
सूर्यकुमार यादवने मागील सामन्यात हाँगकाँग विरुद्ध विशेष खेळी केली होती. त्यामुळे त्याच्याकडून या सामन्यातही चांगल्या खेळीची अपेक्षा होती. मात्र, यावेळी फटकेबाजी करण्याच्या नादात सूर्यकुमार यादव झेलबाद झाला. यावेळी त्याला 10 चेंडूत केवळ 13 धावा करता आल्या.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
INDvsPAK: राहुलचे पुन्हा पहिले पाढे पंचावन्न! चांगल्या सुरुवातीनंतर धरला पव्हेलियनचा रस्ता
INDvsPAK: राहुलचे पुन्हा पहिले पाढे पंचावन्न! चांगल्या सुरुवातीनंतर धरला पव्हेलियनचा रस्ता
डायरेक्ट हाणामारी! पहिल्याच षटकांत कर्णधार रोहितने पाकिस्तानला दिला विशेष संकेत