---Advertisement---

भारत वि. पाकिस्तान संघातील ‘हाय व्होल्टेज’ टी२० विश्वचषक सामने, जे क्रिकेट चाहते आजही नाही शकले विसरु

On: मंगळवार, ऑक्टोबर 19, 2021 9:01 PM
---Advertisement---

भारत आणि पाकिस्तान या दोन संघात टी-२० विश्वचषक स्पर्धेचा सामना रंगणार आहे. हा सामना येत्या २४ ऑक्टोबर रोजी दुबई येथे खेळला जाईल. या सामन्यात भारतीय संघाचे नेतृत्व विराट कोहली करेल तर पाकिस्तान संघाचे नेतृत्व बाबर आझम करेल. या दोन्ही संघातील सामने नेहमीच रोमहर्षक राहिले आहेत. यातील काही सामने क्रिकेट चाहते आजवर विसरू शकलेले नाहीत. जाणून घेऊयात अशाच पाच सामन्यांबद्दल, जे आजही क्रिकेट चाहत्यांच्या लक्षात राहिलेले आहेत.

१. १९८६: चेतन शर्माच्या शेवटच्या चेंडूवर जावेद मियांदादचा षटकार
शारजाह येथे खेळले गेलेल्या ऑस्ट्रल-एशिया चषकाच्या अंतिम सामन्यात भारत आणि पाकिस्तान समोरासमोर आले होते. नाणेफेक हारून भारताने प्रथम फलंदाजी करत ५० षटकात २४५ धावा केल्या होत्या. सुनील गावसकर यांनी सर्वाधिक ९२ धावा केल्या तर क्रिस श्रीकांत आणि दिलीप वेंगसरकर यांनी अर्धशतके झळकावली होती. प्रत्युत्तरादाखल पाकिस्तान संघाने ५० षटकात नऊ विकेट गमावून २४८ धावा केल्या आणि सामना जिंकला होता. पाकिस्तानला शेवटच्या चेंडूवर चार धावांची गरज होती. त्यावेळी जावेद मियांदादने चेतन शर्माच्या चेंडूवर षटकार मारून संघाला रोमहर्षक विजय मिळवून दिला होता. जावेदने या सामन्यात नाबाद ११६ धावांची खेळी खेळली होती.

२. १९८७: जेव्हा बरोबरी झालेल्या सामन्यात भारत विजयी ठरला
हैदराबाद येथे खेळल्या गेलेल्या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करत ६ विकेट्स गमावून २१२ धावा केल्या होत्या. रवी शास्त्री यांनी नाबाद ६९ धावा केल्या होत्या. तर कर्णधार कपिल देव यांनी ५९ धावा केल्या होत्या. उत्तरादाखल पाकिस्तान संघाने ७ गडी गमावून २७२ धावा केल्या होत्या. या सामन्यात बरोबरी झाली होती. पण भारतीय संघाने सहा गडी गमावून २१२ धावा केल्या होत्या. तर पाकिस्तान संघाने ७ गडी गमावून. एकंदरित भारतीय संघाने पाकिस्तानपेक्षा कमी विकेट गमावल्या होत्या, म्हणून भारतीय संघाला विजयी घोषित करण्यात आले होते.

३. २००३: सचिनने घेतला पाकिस्तानी गोलंदाजांचा समाचार
सेंचुरियन येथे खेळल्या गेलेल्या भारत-पाकिस्तान सामन्याला कोण विसरू शकेल. पाकिस्तानने आधी फलंदाजी करत २७३ धावा केल्या होत्या. सईद अन्वर १०१ धावांची खेळी खेळली होती. उत्तरादाखल भारतीय संघाने २६ चेंडू शिल्लक ठेवून सामना जिंकला होता. सचिन तेंडुलकरने ७५ चेंडूत ९८ धावांची खेळी खेळली होती, ज्यात त्याने १२ चौकार आणि एक षटकार लगावला होता. आपल्या खेळीदरम्यान सचिनने वकार युनिस आणि शोएब अख्तर यांची गोलंदाजी फोडून काढली होती. या सामन्यात युवराज सिंग ५० आणि राहुल द्रविड यांनी ४४ धावांची खेळी खेळली होती.

४. २००७: टी२० विश्वचषक सामन्यात भारत विजयी
या विश्वचषक स्पर्धेत दुसऱ्यांदा भारत-पाकिस्तान सामना रंगला होता. नाणेफेक जिंकून भारताने २० षटकात १५७ धावा केल्या होत्या. भारताकडून गौतम गंभीरने ५४ चेंडूत ७५ धावा केल्या होत्या. रोहित शर्माने नाबाद ३० धावांची खेळी खेळली होती. उत्तरादाखल पाकिस्तान संघाने ७७ धावांवर आपल्या सहा विकेट गमावल्या. त्यानंतर मिसबाह उल हक ४३ धावा करत भारतीय संघाला संकटात आणले होते. पाकिस्तान संघाला शेवटच्या चार चेंडूत सहा धावा करायच्या होत्या. परंतु जोगिंदर शर्माने मिसबाह उल हकला बाद करत भारताला विजयी केले होते.

५. २०११: भारताने पाकिस्तानला उपांत्य सामन्यात हरवले
सन २०११ मध्ये भारताने विश्वचषक उंचावला होता. परंतु अंतिम सामन्यापेक्षा रोमांचक उपांत्य फेरी सामना झाला होता. मोहाली येथे झालेल्या या सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करत २६० धावा केल्या होत्या. सचिन तेंडुलकरने ८५ तर वीरेंद्र सेहवागने ३८ धावांची खेळी खेळली होती. पाकिस्तानच्या वाहाब रियाजने उत्कृष्ट गोलंदाजी करत पाच विकेट घेतल्या होत्या. उत्तरादाखल भारतीय संघाने पाकिस्तानला २३१ धावांवर सर्वबाद करत सामना २९ धावांनी जिंकला होता.

महत्त्वाच्या बातम्या-

टी२० विश्वचषकातील सर्वोच्च वैयक्तिक खेळी आहे ‘या’ फलंदाजाच्या नावे, ५८ चेंडूत ठोकल्या होत्या १२३ धावा

विराटच्या शिलेदाराचा पराक्रम; दोन देशांकडून टी२० विश्वचषक खेळण्याचा केला पराक्रम

गोलंदाजानेही सोडली होती आशा, इतक्यात श्रीलंकन कर्णधाराने टिपला अविश्वसनीय झेल; पाहून तोंडात बोटे घालाल

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---