टी-२० विश्वचषक २०२१ स्पर्धेला प्रारंभ झाला आहे. टी-२० विश्वचषक स्पर्धेचा इतिहास पाहिला तर या स्पर्धेत अनेक मोठमोठे विक्रम घडले आहेत. या स्पर्धेत ७ असे फलंदाज आहेत, ज्यांना शतक साजरे करण्यात यश आले आहे. दरम्यान या स्पर्धेत सर्वात मोठी खेळी खेळण्याचा विक्रम ब्रेंडन मॅक्क्युलमच्या नावे आहे, जो आजवर कोणालाही तोडता आला नाहीये.
हा आयसीसी टी-२० विश्वचषक स्पर्धेचे सातवे हंगाम असणार आहे. यापूर्वी झालेल्या ६ हंगामात ब्रेंडन मॅक्क्युलम हा एकमेव फलंदाज आहे, ज्याच्या नावे टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या इतिहासात सर्वात मोठी खेळी खेळण्याचा विक्रम आहे. ब्रेंडन मॅक्क्युलमने हा विक्रम २०१२ टी-२० विश्वचषक स्पर्धेत बांगलादेश संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात केला होता.
अवघ्या ५८ चेंडूंमध्ये ठोकल्या होत्या १२३ धावा
ब्रेंडन मॅक्क्युलमने २०१२ मध्ये झालेल्या टी-२० विश्वचषक स्पर्धेत ही तुफानी खेळी केली होती. त्याने या खेळीदरम्यान ५८ चेंडूंमध्ये १२३ धावा केल्या होत्या, ज्यामध्ये ११ चौकार आणि ७ षटकारांचा समावेश होता. याचा अर्थ असा की, त्याने चौकार आणि षटकारांचा साहाय्याने १०८ धावा केल्या होत्या. या खेळीच्या जोरावर न्यूझीलंड संघाला २० षटकात ३ बाद १९१ धावा करण्यात यश आले होते. या धावांचा पाठलाग करताना बांगलादेश संघाला २० षटकात ८ बाद १३२ धावा करण्यात यश आले होते. हा सामना न्यूझीलंड संघाने ५९ धावांनी आपल्या नावावर केला होता.
टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या इतिहासात सर्वात मोठी खेळणाऱ्या फलंदाजांच्या यादीत दुसऱ्या स्थानी ख्रिस गेल आहे. ज्याने २००७ मध्ये झालेल्या टी-२० विश्वचषक स्पर्धेत ११७ धावांची खेळी केली होती. तर या यादीत तिसऱ्या स्थानी इंग्लंड संघाचा विस्फोटक फलंदाज ॲलेक्स हेल्स आहे, ज्याने श्रीलंका संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात ११६ धावांची खेळी केली होती.
आयसीसी टी -२० विश्वचषक स्पर्धेत सर्वात मोठी खेळी करणारे फलंदाज
१२३ धावा – ब्रेंडन मॅक्क्युलम
११७ धावा – ख्रिस गेल
११६ धावा*- ॲलेक्स हेल्स
१११ धावा*- अहमद शहजाद
१०३ धावा* – तमिम इकबाल
१०१ धावा – सुरेश रैना
१०० धावा* – ख्रिस गेल
१०० धावा – माहेला जयवर्धने
महत्त्वाच्या बातम्या-
टी२० विश्वचषकासाठी सायमंड्सला मिळणार होती मोठी जबाबदारी! मात्र,…
‘… म्हणून टीम इंडिया विश्वचषकात चारते पाकिस्तानला धूळ’; सेहवागचा मोठा खुलासा






