---Advertisement---

भारत-पाकिस्तान महामुकाबल्याच्या तिकीट विक्रीला सुरुवात! जाणून घ्या काय आहे किंमत

On: गुरूवार, ऑगस्ट 25, 2022 12:51 PM
---Advertisement---

आयसीसी पुरुष टी-२० विश्वचषक २०२२मध्ये भारत आणि पाकिस्तान २३ ऑक्टोबर रोजी आमनेसामने येणार आहेत. दोन्ही संघांमधील हा हाय व्होल्टेज सामना मेलबर्नमधील मेलबर्न क्रिकेट मैदानावर खेळवला जाणार आहे. आगामी सामन्याची चाहत्यांना प्रचंड उत्सुकता आहे. या बहुप्रतिक्षित सामन्याची स्टँडिंग रूमची तिकिटे गुरुवारपासून म्हणजेच आजपासून जारी करण्यात येणार आहेत.

गुरुवार २५ ऑगस्टपासून भारत-पाक सामन्यासाठी ४ हजाराहून अधिक स्टँडिंग रूमची तिकिटे आणि मर्यादित संख्येच्या अतिरिक्त जागा जारी केल्या जातील. चाहते ही तिकिटे भारत-पाकिस्तान सामना पाहण्यासाठी t20worldcup.com या वेबसाइटवर पाकिस्तान वेळ सायंकाळी वाजता आणि भारतीय वेळेनुसार सायंकाळी साडेसात वाजल्यापासून सुरू होणार आहे. असे सांगितले जात आहे की स्टँडिंग रूमचे तिकीट ३० डॉलरमध्ये उपलब्ध केले जाईल. यावेळी तिकीटांची विक्री ‘प्रथम येणाऱ्यास प्राधान्य’ या तत्वावर केली जाईल.

महास्पोर्ट्सच्या व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
पाकिस्तानने आशिया चषकासाठी निवडले दोन ‘छुपे रुस्तम’, भारतासाठी ठरत आहेत धोक्याची घंटा!
‘यंदाचा आशिया चषकात भारत…’, शेन वॉटसनने केलीये भविष्यवाणी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---