पाकिस्तानचा माजी दिग्गज खेळाडू रमीझ राजा यांनी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपबद्दल मोठी प्रतिक्रियी दिली असून या चॅम्पियनशिपमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामने आयोजित न केल्या गेल्याने त्यांनी निराशा व्यक्त केली आहे. रमीझ राजा यांच्या म्हणण्यानुसार वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये दोन्ही संघांमध्ये सामना न होण्याचे काहीच कारण नाही.
कोरोना विषाणूमुळे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचे समीकरण काहीसे बदलल्या गेले होते. मात्र याचा पहिला टप्पा अतिशय प्रभावी झाला होता. याबाबत क्रिकेटबाज या यू-ट्यूब चॅनलवर बोलतांना रमीझ राजा म्हणाले, “वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या स्वरूपामध्ये अजून सुधारणा करण्याची आवश्यकता आहे. सध्याच्या चॅम्पियनशिपच्या स्वरूपामध्ये बर्याच कमतरता असून, भारत आणि पाकिस्तान यांच्यात मालिका नसणे आम्हाला आश्चर्यचकित करत आहे. तसेच संघ समान सामनेही खेळत नाहीत आणि पॉईंट सिस्टम देखील विचित्र आहे. यासाठी तीन महिन्यांची विंडो असावी आणि प्रत्येक संघ एकमेकांविरूद्ध खेळायला हवा.”
पुढे ते म्हणाले, “जर आपण वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपबद्दल बोललो तर काही संघांनी खूप जास्त सामने खेळले आहेत तर काही संघांनी खूप कमी सामने खेळले आहेत. उदाहरणार्थ, भारतीय संघाने या काळात १७ कसोटी सामने खेळले, तर दुसरीकडे बांगलादेश संघाने फक्त ५ सामने खेळले आहेत.” तसेच रमीज राजाने सुचवले की वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या वेळी आणखी दुसरे क्रिकेटचे सामने नसावे, जेणेकरून संपूर्ण जगाचे लक्ष चॅम्पियनशिपकडे राहिले पाहिजे.
“पुढच्या वेळी जेव्हा ही स्पर्धा होईल, त्यावेळी कोणतेही क्रिकेट आयोजित करू नये. जर आपल्याला कसोटी क्रिकेटचा प्रचार करायचा असेल आणि प्रायोजक हवे असतील तर आपल्याला असे करावे लागेल. कारण आपण त्यांना इतर कोणताही पर्याय न दिल्यास आपणास प्रायोजकत्व मिळेल”, असे ते शेवटी म्हणाले.
महत्वाच्या बातम्या:
संपूर्ण कारकीर्दीत न जमलेला हा कारनामा सचिनने केला रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीजमध्ये
सलामीच्या स्थानासाठी या खेळाडूंना द्यावी पसंती, गावसकरांचा भारताला सल्ला
शाहरुखची केकेआर आली टेन्शनमध्ये, सामना एकहाती फिरवणाऱ्या या दिग्गज खेळाडूच्या सहभागावर प्रश्नचिन्ह