---Advertisement---

उत्सुकता भारत-पाकिस्तान सामन्याची! तिकीटं ३३३ पट महाग, तर हॉटेलही झाले फुल

On: शुक्रवार, ऑक्टोबर 22, 2021 9:43 PM
---Advertisement---

क्रिकेटविषयी चाहत्यांचे वेड एका वेगळ्याच टोकाला गेलेले आहे. दुबईत सर्वत्र टी२० विश्वचषकाचे फलक दिसत आहेत. त्यातल्या त्यात भारत-पाकिस्तान यांच्यातील क्रिकेटचे द्वंद बघण्याची प्रत्येकाला इच्छा असते. परंतु काही भाग्यवान चाहत्यांनाच स्टेडियममध्ये प्रवेश मिळणार आहे. रविवारी (२४ ऑक्टोबर) होणाऱ्या या सामन्याची तिकिटे दोन आठवड्यांपूर्वीच विकली गेली आहेत.

पहिल्या ३० मिनिटांत तिकिटासाठीची प्रतीक्षा १३ हजार पार गेली होती. पण लोकांनी अजूनही आशा सोडलेली नाही. भारत आणि पाकिस्तानचे चाहते सामन्याचा आनंद घेण्यासाठी दुबईत पोहोचत आहेत. चाहत्यांची गर्दी वाढल्याने हॉटेल्स पूर्णपणे भरली आहेत.

दैनिक भास्करने दिलेल्या वृत्तानुसार अमेरिका आणि कॅनडामधील लोकांनी सामन्यासाठी पॅकेजेस खरेदी केली आहेत. दुबईस्थित ट्रॅव्हल कंपनीच्या पर्यवेक्षकाने वृत्तपत्राशी बोलताना सांगितले की, एका रात्रीच्या मुक्कामासह ५०० पॅकेजेस सामन्याच्या तिकिटांसह देण्यात आली होती. पण हे सर्व बुक झाले आहेत. एका पॅकेजची किंमत ४०,७०० रुपये इतकी होती.

दुसरीकडे, दुबईतील रेस्टॉरंट्स आणि बार देखील लोकांना आकर्षित करण्यासाठी नवं-नवीन ऑफर आणत आहेत. एका कंपनीने लकी ड्रॉद्वारे १०० कामगारांना सामन्याची तिकिटे दिली आहेत.

पहिल्या ३० मिनिटांत सामन्याची सर्व तिकिटे विकली गेली. प्रतिक्षा यादी देखील १३ हजार पार गेली आहे. अनेक वेबसाइटवर तिकिटे ४ ते ५ पट अधिक किमतीत विकली जात आहेत. सर्वात महागडी तिकिटे सुमारे २ लाख रुपये इतकी आहेत, जी सामान्य तिकिटापेक्षा सुमारे ३३३ पट महाग आहेत. वेगवेगळ्या स्टॅण्डची किंमत वेगवेगळी असते. तिकिटांची सर्वात कमी किंमत १२,५०० रुपये होती. याशिवाय, क्रिकेट चाहत्यांना प्रीमियम आणि प्लॅटिनम स्टँडसाठी अनुक्रमे ३१,२०० आणि ५४,१०० रुपयांची तिकिटे खरेदी करण्याची संधी होती.

महागड्या जाहिराती
मीडिया रिपोर्टनुसार, टीव्हीवरही खूप महागड्या जाहिराती विकल्या गेल्या आहेत. असे म्हटले जात आहे की १०-१० सेकंदाचा स्लॉट देखील २५ ते ३० लाख रुपयांना विकला गेला आहे. असे मानले जात आहे की यापूर्वी अशा महागड्या जाहिराती विकल्या गेलेल्या नाहीत.

महत्त्वाच्या बातम्या – 

“हार्दिक पांड्याने गोलंदाजी केली नाही, तर मी त्याला माझ्या संघात ठेवणार नाही”

तो परत आला! पाकिस्तानच्या पराभवानंतर ‘ओ भाई मारो मुझे’ म्हणणारा चाहता पुन्हा चर्चेत, व्हिडिओ होतोय व्हायरल

एकट्या विराटची कामगिरी पाकिस्तानला घाम फोडण्यासाठी पुरेशी, पाहा ‘रनमशीन’ची जबरदस्त आकडेवारी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---