न्यूझीलंडमध्ये सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट काउंसिल (आयसीसी, ICC) महिला वनडे विश्वचषक २०२२ (Women ODI World Cup) चा थरार सुरू आहे. ४ मार्चपासून ही स्पर्धा सुरू झाली आहे. मात्र भारतीय संघ रविवार अर्थात ६ मार्चपासून त्यांच्या विश्वचषक अभियानाची सुरुवात करेल. भारताचा विश्वचषकातील पहिला सामना पारंपारिक प्रतिद्वंद्वी पाकिस्तान संघाविरुद्ध होणार आहे. बे ओव्हल स्टेडियम, माउंट मौनगानुई येथे हा सामना रंगणार आहे.
हा सामना दोन्हीही संघांसाठी महत्त्वाचा असणार आहे. भारत विरुद्ध पाकिस्तान (IND vs PAK) यांच्यातील वनडे सामन्यांचा इतिहास पाहायचे झाल्यास, भारतीय संघाने पाकिस्तानला पराभवाची धूळ चारली आहे. एकूण वनडे सामन्यांतील आकडेवारीबद्दल पाहायचे झाल्यास, भारतीय संघाने पाकिस्तानविरुद्धचे आतापर्यंतचे १० वनडे सामने खेळले आहेत आणि हे १० ही सामने जिंकले आहेत. त्यामुळे कर्णधार मिताली राज हा विक्रम अबाधित राखण्यासाठी प्रयत्नशील असेल. तर पाकिस्तानचा संघ हा विक्रम मोडत इतिहास रचण्यावर भर देईल.
तत्पूर्वी भारत आणि पाकिस्तान संघातील विश्वचषक सामन्याबद्दल (IND vs PAK Match Details) सर्व माहिती जाणून घेऊ.
केव्हा होणार भारत विरुद्ध पाकिस्तान महिला संघातील विश्वचषक सामना?
भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील विश्वचषकातील पहिला सामना ६ मार्च रोजी होणार आहे.
कुठे होणार भारत विरुद्ध पाकिस्तान महिला संघातील विश्वचषक सामना?
भारत विरुद्ध पाकिस्तान संघातील विश्वचषक सामना बे ओव्हल स्टेडियम, माउंट मौनगानुई येथे होणार आहे.
किती वाजता होणार भारत विरुद्ध पाकिस्तान महिला संघातील विश्वचषक सामना?
भारत विरुद्ध पाकिस्तान संघातील विश्वचषक सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी ६.३० वाजता होणार आहे. त्यामुळे अर्धा तास पूर्वी म्हणजेच सकाळी ६ वाजता या सामन्यासाठी नाणेफेक होईल.
टीव्हीवर कसा पाहता येईल भारत विरुद्ध पाकिस्तान महिला संघातील विश्वचषक सामना?
भारत आणि पाकिस्तान संघातील विश्वचषक सामन्याचा थरार प्रेक्षक टीव्हीवर अनुभवू शकतात. टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या चॅनलवर या सामन्याचा रोमांच अनुभवता येईल.
ऑनलाईन कसा पाहता येईल भारत विरुद्ध पाकिस्तान महिला संघातील विश्वचषक सामना?
भारत आणि पाकिस्तान संघातील सामना ऑनलाईन पाहण्यासाठी तुमच्याकडे डिज्नी प्लस हॉटस्टारचे सब्सक्रिप्शन असणे गरजेचे आहे. तसेच महास्पोर्टसवरही तुम्ही या सामन्याचे लाईव्ह अपडेट पाहू शकता.
महत्त्वाच्या बातम्या-
‘जोपर्यंत मी चांगली फलंदाजी करतोय, तोपर्यंत चिंता नाही’, १०० वा कसोटी खेळणाऱ्या विराटची प्रतिक्रिया
INDvSL: दुसऱ्या दिवशीच मोहाली कसोटीवर टीम इंडियाची पकड; ‘सर’ जडेजाने गाजवला दिवस