INDvsSA 1st T20: रविवारपासून (दि. 10 डिसेंबर) भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 3 सामन्यांच्या टी20 मालिकेची सुरुवात करेल. या मालिकेसाठी भारतीय संघ मागील ऑस्ट्रेलिया मालिकेपेक्षा जरा वेगळा दिसेल. कारण, या संघात शुबमन गिल, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज यांसारखे स्टार खेळाडू पुनरागमन करत आहेत. अशात संघाच्या संतुलनाविषयी बोलायचं झालं, तर आता भारतीय संघात 4 सलामी फलंदाज उपलब्ध आहेत. चारही फलंदाज खेळण्यासाठी दावेदार आहेत. त्यामुळे कर्णधार सूर्यकुमार यादव आणि संघ व्यवस्थापनासाठी सर्वात मोठी डोकेदुखी ही असेल की, नक्की सलामीला फलंदाजी कोण करेल.
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) संघातील पहिला टी20 सामना (INDvsSA 1st T20) सुरू होण्याच्या एक दिवस आधी सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) याने सलामी जोडीविषयी चर्चा केली. त्याने शनिवारी (दि. 9 डिसेंबर) माध्यमांशी बोलताना सूर्याला विचारण्यात आले की, संघात एवढे सलामीवीर आहेत, तर त्याला निवड करण्यात कोणती अडचण आहे का? यावर सूर्याने स्पष्टपणे म्हटले की, समस्या काहीच नाहीये आणि चांगले आहे की, आमच्याकडे एवढे पर्याय आहेत.
निर्णय घ्यावा लागेल
सूर्यकुमार यादवने सलामी जोडीविषयी म्हटले की, “इतके सारे प्रतिभावान लोक आले आहेत, तर चांगले आहे. व्यवस्थापनाशी चर्चा होईल, मग निर्णय होईल. मात्र, निर्णय झाला आहे आणि सामन्याच्या दिवशी याचा खुलासा होईल की, सलामीला कोण खेळेल.”
Suryakumar Yadav believes the team knows the key factor required to succeed on South African pitches 👊#SAvINDhttps://t.co/YpFZfX1GiB
— ICC (@ICC) December 9, 2023
यावेळी त्याने हेही मान्य केले की, संघात यशस्वी जयसवाल, ऋतुराज गायकवाड, इशान किशन आणि शुबमन गिल यांच्या रूपात सलामीला फलंदाजी करण्यासाठी चार दावेदार आहेत. मागील मालिकेत ऋतुराज आणि यशस्वीने शानदार प्रदर्शन केले होते. इशानला काही सामन्यात मधल्या फळीत खेळवले होते, त्यानंतर त्याला बाहेर बसवले होते. आता हे पाहणे महत्त्वाचे ठरेल की, कोणत्या खेळाडूला कोणती जबाबदारी मिळते.
टी20 मालिकेसाठी भारतीय संघ
सूर्यकुमार यादव (कर्णधार), यशस्वी जयसवाल, शुबमन गिल, ऋतुराज गायकवाड़, इशान किशन (यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर, तिलक वर्मा, रिंकू सिंग, रवींद्र जडेजा (उपकर्णधार), जितेश शर्मा (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, रवी बिश्नोई, मुकेश कुमार, अर्शदीप सिंग, दीपक चाहर, मोहम्मद सिराज (india vs south africa 1st t20 match opening pair skipper suryakumar yadav statement ishan kishan shubman gill)
हेही वाचा-
विजय मिळवूनही निराश झाला कीवी कर्णधार; म्हणाला, ‘माझ्या करिअरमधली सर्वात खराब…’
युवराजला का मिळत नाही वर्ल्डकप 2011चे श्रेय?, रोखठोक मत मांडत गंभीर म्हणाला, ‘त्याच्याकडे…’