---Advertisement---

आज कन्यारत्न प्राप्त झालेल्या रहाणेची २४ मिनीटांत कसोटीत धमाकेदार खेळी

On: शनिवार, ऑक्टोबर 5, 2019 5:11 PM
---Advertisement---

विशाखापट्टणम। भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात बुधवारपासून सुरु झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताने दुसरा डाव 4 बाद 323 धावांवर घोषित केला आहे. तसेच पहिल्या डावात घेतलेल्या 71 धावांच्या आघाडीसह दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी 395 धावांचे आव्हान दिले आहे.

या डावाच्या शेवटच्या अर्धातासात अजिंक्य रहाणेेने 17 चेंडूत 4 चौकार आणि 1 षटकारासह नाबाद 27 धावांची तुफानी खेळी केली. या खेळीबरोबरच त्याने कर्णधार विराट कोहलीसह 25 चेंडूत नाबाद 37 धावांची भागीदारीही रचली. त्यामुळे भारताला जलद 300 धावांचा टप्पा पार करता आला. कोहलीने नाबाद 31 धावा केल्या.

विशेष म्हणजे आज रहाणेला कन्यारत्न झाले आहे. त्याची पत्नी राधिकाने आज एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे.

सध्या सुरु असलेल्या भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका पहिल्या कसोटीत दुसऱ्या डावात जडेजा बाद झाल्यानंतर रहाणे खेळायला आला होता. जडेजाला आज फलंदाजी क्रमांकात बढती मिळाली तो आज चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आला होता. त्यानेही या संधीचा फायदा घेत 32 चेंडूत 3 षटकारांसह 40 धावांची खेळी केली.

तत्पूर्वी भारताकडून या डावात सलामीवीर फलंदाज रोहित शर्माने शतकी खेळी केली आहे. त्याने 149 चेंडूत 127 धावा करताना 10 चौकार आणि 7 षटकार मारले आहेत. तसेच त्याने चेतेश्वर पुजाराबरोबर दुसऱ्या विकेटसाठी 169 धावांची भागीदारीही रचली आहे. पुजारा 81 धावा करुन बाद झाला.

या डावात दक्षिण आफ्रिकेकडून केशव महाराजने 2 विकेट्स, तर वर्नोन फिलँडर आणि कागिसो रबाडाने प्रत्येकी 1 विकेट घेतली आहे.

त्याआधी या सामन्यात भारताने पहिला डाव 7 बाद 502 धावांवर घोषित केला होता. तसेच दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव 431 धावांवर संपल्याने भारताने 71 धावांची आघाडी घेतली होती.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment