---Advertisement---

दुसऱ्या वनडेतही पाऊस घालणार रोडा! चला बघूया काय म्हणतंय हवामान

On: शनिवार, ऑक्टोबर 8, 2022 7:18 PM
ind vs sa
---Advertisement---

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला एकदिवसीय सामना लखनऊमध्ये खेळला गेला. पाहुण्या आफ्रिकी संघाने या सामन्यात भारताला 9 धावांनी पराभूत करून विजय मिळवला. पहिल्या वनडे सामन्यात पावसाने व्यत्यय आणला होता. आता दुसऱ्या सामन्यात देखील पाऊस हजेरी लावणार असा अंदाजा सांगितला गेला आहे. उभय संघातील हा दुसरा वनडे सामना रांचीमध्ये रविवार, 9 ऑक्टोबर रोजी खेळला जाईल. 

रांचीच्या जेएससीए आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर रविवारी खेळल्या जाणाऱ्या या दुसऱ्या वनडे सामन्यात भारत विजय मिळवण्यासाठी पूर्ण प्रयत्न करेल. विजयासाठी खेळाडूंचे प्रदर्शन जितके महत्वाचे आहे, तितकेच महत्वाचे असेल मैदानातील वातावरण. उभय संघातील पहिला वनडे सामना लखनऊमध्ये खेळला गेला असून यजमान भारताने या सामन्यात पराभव स्वीकारला. सामन्याच्या निकालात पावसाने देखील महत्वाची भूमिका पार पाडली. पावसामुळे हा सामना 50 षटकांऐवजी 40 षटकांचा केला गेला होता. आता दुसऱ्या वनडे सामन्यात देखील अशीच परिस्थिती उद्भवू शकते.

पहिला वनडे सामना पावसामुळे तब्बल सव्वा दोन तास उशीरा सुरू झाला होता. आशात दुसऱ्या सामन्याता देखील परिस्थिती फारशी काही वेगळी असेल, असे वाटत नाही. कारण हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजात रविवारी दुपारनंतर पावसाची शक्यता सांगितली गेली आहे. असे असले तरी, सामन्यावर याचा जास्त परिणाम पडणार नाही, असे मानले जात आहे. कारण झारखंड क्रिकेट असोसिएशनने याचे चांगले नियोजन केले आहे.

रांचीच्या प्रादेशिक हवामान विभागने वैज्ञानिक अभिषेक आनंद यांनी याविषयी माध्यमांशी चर्चा केली. ते म्हणाले, “9 तारखेला भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामना आहे. असा अंदाज आहे की, दुसऱ्या भागात हलकासा पाऊस येऊ शकतो. पण जेसीएने यासाठी चांगली व्यवस्था केली आहे. त्यामुळे अपेक्षा आहे की, पावसामुळे जास्त काही बाधा येणार नाही.”

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
बुमराह कुठे झाला गुमराह! टी20 वर्ल्डकपसाठी ऑस्ट्रेलियात पोहोचलेली बुम-बुमची बायको ट्रोल
शेफालीने टी20त रचला इतिहास, तिच्या वयाच्या कुठल्याच खेळाडूला जमला नाही ‘असा’ पराक्रम 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---