INDvsSA, Suryakumar Yadav Record: दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत संघात पार पडलेल्या 3 सामन्यांच्या टी20 मालिकेतील दुसऱ्या सामन्यात सूर्यकुमार यादव याच्या सेनेला 5 विकेट्सने पराभूत व्हावे लागले. हा सामना गमावला असला, तरीही कर्णधार सूर्यकुमार यादव शानदार लयीत दिसला. या सामन्यात भारताने पराभव पत्करला असला, तरीही सूर्याने खास विक्रम आपल्या नावावर केला आहे. या विक्रमात सूर्यकुमार यादव एमएस धोनी याला पछाडत पुढे गेला आहे.
सूर्यकुमार यादवचा विक्रम
झाले असे की, या सामन्यात नाणेफेक गमावत भारतीय संघ (Team India) प्रथम फलंदाजीला उतरला होता. यावेळी भारताकडून चौथ्या स्थानावर सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) फलंदाजीला उतरला. सूर्याने यावेळी 36 चेंडूंचा सामना करताना 155.56च्या स्ट्राईक रेटने 56 धावांची महत्त्वपूर्ण अर्धशतकी खेळी केली. त्याच्या खेळीत 3 षटकार आणि 5 चौकारांचाही पाऊस पडला. ही खेळी करताच, त्याने खास पराक्रम गाजवला.
सूर्यकुमार यादव टी20 क्रिकेट प्रकारात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध त्यांच्याच देशात कर्णधार म्हणून सर्वात मोठी खेळी करणारा पहिला भारतीय बनला. त्याच्यापूर्वी हा विक्रम भारताचा माजी दिग्गज कर्णधार एमएस धोनी (MS Dhoni) याच्या नावावर होता. त्याने 16 वर्षांपूर्वी म्हणजेच 2007मध्ये कर्णधार म्हणून भारताकडून दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 45 धावांची खेळी केली होती. मात्र, आता सूर्याने धोनीला या विक्रमात मागे टाकले आहे. हे सूर्याचे टी20 कारकीर्दीतील 17वे अर्धशतक ठरले.
सूर्याचा असाही कारनामा
सेंट जॉर्ज पार्क येथे पार पडलेल्या या सामन्यात सूर्यकुमारने साकारलेल्या अर्धशतकाच्या जोरावर आणखी एक पराक्रम केला. तो असा की, सूर्यकुमारने आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमधील 2000 धावांचा टप्पा पार केला. ही कामगिरी करण्यासाठी त्याला 56 डाव खेळावे लागले. सूर्यापूर्वी विराट कोहली यानेही ही कामगिरी 56 डावांमध्ये पार केली होती. या दोघांव्यतिरिक्त पाकिस्तानचा माजी कर्णधार बाबर आझम आणि यष्टीरक्षक फलंदाज मोहम्मद रिझवान यांनी हा कारनामा प्रत्येकी 52-52 डावांमध्ये केला होता. (india vs south africa 2nd t20i match 2023 captain suryakumar yadav as a captain most runs in south africa ms dhoni)
हेही वाचा-
INDvsSA T20: सूर्याला माहितीये, संघाकडून कुठे झाली चूक? पराभवानंतर मोठे विधान करत म्हणाला…
T20i Series । दक्षिण आफ्रिका 14व्या षटकात विजयी, 5 विकेट्सने राखून भारताला चारली पराभवाची धूळ