---Advertisement---

“काहीही झालं तरी विजय…” फायनलपूर्वी आफ्रिकेचा कर्णधार मार्करमनं दिला टीम इंडियाला इशारा

On: शनिवार, जून 29, 2024 3:39 PM
---Advertisement---

टी20 विश्वचषक 2024 मधील अंतिम सामना आज (29 जून) होणार आहे. हा सामना भारत आणि दक्षिण आफ्रिका या दोन मजबूत संघात रंगणार आहे. वेस्ट इंडिज येथे होत असलेल्या यंदाच्या टी20 विश्वचषकाचा आज शेवटचा दिवस आहे. सेमी फायनलमध्ये भारतीय संघाने विश्वविजेता इंग्लंड संघास हरवून फायनलमध्ये प्रवेश मिळवला तर दक्षिण आफ्रिका अफगाणिस्तानवर मात करुन फायनल मध्ये धडक मारली. या दरम्यान सामन्यापूर्वी दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एडन मार्करमने भारतीय संघाला इशारा दिला आहे.

मार्करमने फायनलपूर्वी सांगितले की, आम्हाला बाहेर जाऊन संघासाठी जिंकण्याची भूक आहे. ट्रॉफीसाठी मनापासून खेळणार असल्याचे आफ्रिकेच्या कर्णधाराने स्पष्ट केले. पहिल्या विश्वचषकाची ट्रॉफी मला कोणत्याही किंमतीत हातातून निसटू द्यायची नाही. दक्षिण आफ्रिकेचा संघ 32 वर्षांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर प्रथमच विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे.

सामन्यापूर्वी पत्रकार परिषदेत मार्करम म्हणाला, “भारत हा एक महान संघ आहे. दक्षिण आफ्रिका गेल्या काही वर्षांपासून योग्य दिशेने प्रगती करत आहे. आमच्यासाठी ही मोठी संधी आहे.  सामना जिंकण्याची आमच्यात भूक आहे. काहीही झाला तरी आम्हाला बाहेर जावेच लागणार आहे त्यामुळे आम्ही विजय मिळवून बाहेर पडू”.

संघाविषयी पुढे बोलताना आफ्रिकेचा कर्णधार म्हणाला, “आम्ही कोणत्याही परिस्थितीत सामना जिंकू शकतो हा विश्वास आहे. एक संघ म्हणून, आम्ही अनेक वर्षांपासून कामगिरी करत आलो आहोत. खेळाडूंना शेवटी त्यांची भूमिका समजू लागली आहे. यामुळे विश्वास आहे आम्ही ट्राॅफी जिंकू”

वास्तविक, यंदाच्या टी20 विश्वचषकात भारत आणि दक्षिण आफ्रिका दोन्ही संघाने आतापर्यंत एकही सामने गमावले नाहीत. भारतीय संघ साखळी सामन्यातील 4 पैकी 3 सामने जिंकले  होते. तर एक सामना पावसामुळे अनिर्णीत राहिला. तर सुपर-8 मध्ये 3 पैकी 3 सामने जिंकले आहे. तर सेमी फायनलमध्ये भाताने इंग्लंडला हरवले होते. तर दुसरीकडे दक्षिण आफ्रिका स्पर्धेत अपारिजत आहे. संघाने मागील 8 पैकी 8 सामन्यात विजय मिळवला आहे.

महत्तवाच्या बातम्या-

कुठे पूजा…तर कुठे होम हवन! टीम इंडियाच्या विजयासाठी चाहत्यांचे देव पाण्यात
टी20 विश्वचषक विजेत्यावर होणार पैशांचा वर्षाव, उपविजेता संघही होणार मालामाल! बक्षिसाची रक्कम जाणून घ्या
शिवम दुबेचा पत्ता कट? टीम इंडिया बदलणार सलामी जोडी, पाहा फायनलमध्ये भारताची संभाव्य प्लेइंग 11

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---