टी20 विश्वचषकचा अंतिम सामना आज (29 जून) होणार आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघा समोर दक्षिण आफ्रिका संघ असणार आहे. दोन्ही संघ बार्बाडोसमध्ये भारतीय वेळेनुसार राक्ष 8 वाजता आमनेसामने येतील. टीम इंडिया सेमीफायनलमध्ये इंग्लंडला मात देत फायनलमध्ये प्रवेश मिळवला तर दुसरीकडे दक्षिण आफ्रिका सेमीफायनलमध्ये अफगाणिस्तानवर एकतर्फी विजय मिळवला. मात्र, दोन्ही संघांमध्ये चुरशीची स्पर्धा पाहायला मिळणार आहे. तसेच, या सामन्यात अनेक खेळाडूंमध्ये परस्पर लढत होणार आहे, जी या स्पर्धेचा विजेता ठरवण्यात महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.
विराट कोहली विरुद्ध मार्को यानसन
भारतीय संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली सध्या खराब फाॅर्ममध्ये आहे. स्पर्धेत कोहली धावा काढण्यासाठी संघर्ष करत आहे. परंतु फायनलमध्ये आज विराट कोहली आपली छाप सोडणार का हे पहाणं महत्वाच राहील. दक्षिण आफ्रिकेचे गोलंदाज विराट कोहलीसाठी मोठे आव्हान ठरु शकतो विशेषतः, मार्को यानसन मोठा असेल. वास्तविक, या वेगवान गोलंदाजाला त्याच्या उंचीमुळे चांगल्या वेगाव्यतिरिक्त स्विंग मिळतो. त्यामुळे विराट कोहलीसाठी मार्को यानसनच्या धावा कठीण होऊ शकतात. मात्र, या दोन खेळाडूंमध्ये रंजक लढत पाहायला मिळते.
रोहित शर्मा विरुद्ध कागिसो रबाडा
भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा सध्या विस्फोटक फाॅर्म मध्ये आहे. त्याने मागील दोन सामन्यात अर्धशतकी खेळी खेळला आहे. पण अश्या स्थितीत दक्षिण आफ्रिकाकडे देखील हुकमी एक्का आहे. कागिसो रबाडा भारतीय कर्णधार रोहित शर्मामध्ये टक्कर पहायला मिळू शकते. सुरुवातीच्या षटकात रोहितला रबाडाच्या गोलंदाजीवर सांभाळून आपला डाव आखावा लागेल. कारण नव्या चेंडूवर कागिसो रबाडाने रोहितला 20 पैकी 16 वेळा बाद केले आहे.
जसप्रीत बुमराह विरुद्ध क्विंटन डी कॉक
यंदाच्या टी20 विश्वचषकात जसप्रीत बुमराह टीम इंडियाच्या वेगवान गोलंदाजीचे नेतृत्व करत आहे. जसप्रीत बुमराह सुरुवातीच्या षटकांनंतर मधल्या षटकांमध्ये आणि डेथ ओव्हर्समध्ये विकेट घेत आहे, त्यामुळे रोहित शर्माचे काम सोपे होत आहे. पण जसप्रीत बुमराह दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आश्चर्यकारक कामगिरी करू शकेल का? विशेषत: सुरुवातीच्या षटकांमध्ये जसप्रीत बुमराहवर मोठी जबाबदारी असेल. वास्तविक, दक्षिण आफ्रिकेचा सलामीवीर क्विंटन डी कॉक टीम इंडियासाठी मोठा धोका बनू शकतो. त्यामुळे क्विंटन डी कॉकला लवकरात लवकर तंबूत पाठवण्याची जबाबदारी जसप्रीत बुमराहवर असणार नाही.
सूर्यकुमार यादव विरुद्ध तबरेझ शम्सी
भारतीय संघासाठी मधल्या षटकांमध्ये सूर्यकुमार यादव महत्त्वाची भूमिका बजावत आहे. विशेष म्हणजे हा फलंदाज ज्या पद्धतीने फिरकीपटूंविरुद्ध खेळतोय ते कौतुकास्पद आहे, पण दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सूर्यकुमार यादवची बॅट चालेल का? दक्षिण आफ्रिकेकडे मधल्या षटकांमध्ये तबरेझ शम्सीसारखे अनुभवी फिरकीपटू आहेत, त्यामुळे सूर्यकुमार यादवसाठी हा मार्ग सोपा नसेल.
महत्तवाच्या बातम्या-
अंतिम सामन्यात टॉस जिंकल्यानंतर आधी फलंदाजी करायची की गोलंदाजी? जाणून घ्या खेळपट्टीचा अहवाल
IND vs RSA सामना सुपर ओव्हरमध्येही टाय झाला तर ट्राॅफी कुणाची?
फायनलपूर्वीच केलं टीम इंडियाचं अभिनंदन, स्टार बाॅलीवूड अभिनेत्याची पोस्ट व्हायरल