---Advertisement---

IND vs SA: वर्ल्ड कपमधील 7 लढतींचा इतिहास काय सांगतो? पाहा कोणाचं पारडं जड

On: शनिवार, फेब्रुवारी 21, 2026 6:21 PM
IND vs RSA (1)
---Advertisement---

आयसीसी टी-20 वर्ल्ड कप 2026 (icc T20 international world cup 2026) च्या ग्रुप स्टेजमध्ये टीम इंडियाने आपला विजयाचा धडाका कायम राखला आहे. आता भारतीय संघ सुपर-8 फेरीची सुरुवात 22 (india vs south africa) फेब्रुवारीला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्याने करणार आहे. हा हाय-व्होल्टेज सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाईल.

वर्ल्ड कपच्या इतिहासात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारताचा रेकॉर्ड जबरदस्त राहिला असून, या सामन्यातही टीम इंडियाचं पारडं जड मानलं जात आहे. मात्र, दक्षिण आफ्रिकेनेही ग्रुप स्टेजमध्ये एकही सामना गमावलेला नसल्यामुळे भारतीय संघ त्यांना हलक्यात घेण्याची चूक करणार नाही.

वर्ल्ड कपच्या इतिहासात आतापर्यंत भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात एकूण 7 सामने झाले आहेत. त्यापैकी भारतीय संघ 5 वेळा तर दक्षिण आफ्रिका 2 वेळा विजयी झाली आहे. या आकडेवारीवरून स्पष्ट होते की, बहुतांश वेळा भारताने आफ्रिकेवर वर्चस्व गाजवले आहे. विशेष म्हणजे, 2024 च्या टी-20 वर्ल्ड कप फायनलमध्ये भारताने दक्षिण आफ्रिकेला 7 धावांनी नमवून जेतेपद पटकावले होते.

दोन्ही संघांमधील गेल्या 7 सामन्यांचे निकाल
2007: भारत 37 धावांनी विजयी
2009: दक्षिण आफ्रिका 12 धावांनी विजयी
2010: भारत 14 धावांनी विजयी
2012: भारत 1 धावेने विजयी
2014: भारत 6 विकेट्सनी विजयी
2022: दक्षिण आफ्रिका 5 विकेट्सनी विजयी
2024: भारत 7 धावांनी विजयी

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हे दोन्ही संघ आतापर्यंत फक्त एकदाच समोरासमोर आले आहेत. 2025 च्या अखेरीस झालेल्या त्या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना 231 धावांचा डोंगर उभा केला होता. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेला 201 धावांपर्यंतच मजल मारता आली आणि भारताने 30 धावांनी विजय मिळवला होता.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---