भारतीय संघाला दक्षिण अफ्रिका दौऱ्यात (south africa tour of india) २६ डिसेंबरपासून पहिला कसोटी सामना खेळायचा आहे. हा सामना सेंचुरीयनमधील सुपर स्पोर्टस पार्कमध्ये (super sports park) आयोजित केला गेला आहे. या स्टेडियमचा इतिहास पाहिला तर दक्षिण अफ्रिका संघासाठी याठिकाणची परिस्थिती नेहमीच अनुकूल राहिली आहे. तर दुसरीकडे भारतीय संघ याठिकाणी खेळलले सगळे कसोटी सामने पराभूत झाला आहे.
दक्षिण अफ्रिका संघाने मागच्या २६ वर्षांत सुपरस्पोर्ट पार्कमध्ये २६ कसोटी सामने खेळले आहेत आणि त्यापैकी २१ सामने जिंकले आहेत. दक्षिण अफ्रिकेने या स्टेडियममध्ये फक्त दोन सामने गमावले आहेत, तर राहिलेले तीन सामने अनिर्णीत ठरले आहेत. विदेशी संघांपैकी फक्त इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया संघ या स्टेडियमवर कसोटी सामना जिंकू शकले आहेत. इंग्लंडने २००० साली याठिकाणी २ विकेट्स राखून विजय मिळवला होता, तर ऑस्ट्रेलियाने ६ वर्षांपूर्वी दक्षिण अफ्रिकेला याच स्टेडियमवर २८१ धावांनी पराभूत केले होते.
भारतीय संघाचा या स्टेडियमवरील इतिहास पाहिला, तर तो निराशाजनक आहे. भारताने या मैदानात दोन कसोटी सामने खेळले आणि दोन्हींमध्ये संघाला पराभव मिळाला. २०१० मध्ये भारताने याठिकाणी पहिला कसोटी सामना खेळला होता. या सामन्यात भारतीय संघ एक डाव आणि २५ धावांनी पराभूत झाला होता. त्यानंतर मागच्या दक्षिण अफ्रिका दौऱ्यात भारतीय संघाने या मैदानावर खेळलेल्या कसोटी सामन्यात १३५ धावांनी पराभव पत्करला होता.
हेही वाचा- ‘बॉक्सिंग डे कसोटी’ म्हणजे काय रे भाऊ? जाणून घ्या सर्वकाही
दक्षिण अफ्रिका संघासाठी या मैदानावरची परिस्थिती एवढी अनुकूल राहिली आहे की, त्यांच्या संघाने याठिकाणी खेळलेल्या सामन्यांपैकी ९ सामने एका डावाच्या फरकाने जिंकले आहेत. यापैकी सर्वात मोठा विजय वेस्ट इंडीज संघाविरुद्ध मिळवला होता. वेस्ट इंडीजविरुद्ध २०१४ मध्ये खेळलेल्या या सामन्यात दक्षिण अफ्रिका संघाने एक डाव आणि २२० धावांनी विजय मिळवला होता.
दक्षिण अफ्रिका संघाने या मैदानात खेळलेल्या सामन्यापैकी तीन कसोटी सामने अनिर्णीत राहिले आहेत आणि हे तिन्ही सामने इंग्लंड संघाविरुद्ध होते. इंग्लंड या स्टेडियमवर सर्वाधिक कसोटी सामने खेळणारा विदेशी संघ ठरला आहे. त्यांनी याठिकाणी ६ कसोटी सामने खेळले आहेत आणि त्यापैकी ३ अनिर्णीत केले आणि २ मध्ये पराभव स्वीकारला. राहिलेला एक कसोटी सामना इंग्लंडने जिंकला. इतर विदेशी संघांसाठी या स्टेडियमवर सामना अनिर्णीत करणे देखील शक्य झाले नाही. आता भारतीय संघ पहिल्या कसोटी सामन्यात या स्टेडियमवर काय कमाल करतो? हे पाहावे लागणार आहे.
महत्वाच्या बातम्या –
पाकिस्तानपुढे पुन्हा भारताची शरणागती! अंडर-१९ आशिया चषकात असा गमावला हातातला सामना
प्रो कबड्डी २०२१: यूपी योद्धांचा जबरदस्त विजय, पटणा पायरेट्सवर ३६-३५ च्या फरकाने केली मात
प्रो कबड्डी २०२१: यूपी योद्धांचा जबरदस्त विजय, पटणा पायरेट्सवर ३६-३५ च्या फरकाने केली मात
व्हिडिओ पाहा –