भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-20 मालिकेत 2-1 असा विजय मिळवला. आता संघाच्या पुढचे आव्हान दक्षिण आफ्रिका असेल. दक्षिण आफ्रिका संघ तीन सामन्यांची टी-20 आणि तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळण्यासाठी भारत दौऱ्यावर येत आहे. उभय संघातील टी-20 मालिका बुधवारी, 28 सप्टेंबर रोजी सुरू होणार आहे. टी-20 विश्वचषकापूर्वी संघाला स्वतःची गुणवत्ता तपासण्याच्या दृष्टीने ही शेवटची संधी असेल.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला टी-20 सामना 28 सप्टेंबर रोजी तिरुवनंतरपूरम याठिकाणी खेळळा जाईल. मालिकेतील पुढचे दोन सामने 2 आणि 4 ऑक्टोबरला अनुक्रमे गुवाहाटी आणि इंदोर शहरांमध्ये खेळवले जातील. टी-20 मालिका संपल्यानंतर उभय संघातील एकदिवसीय मालिका सुरू होईल. एकदिवसीय मालिकेतील सामने 6, 9 आणि 11 ऑक्टोबर रोजी खेळले जातील. हे सामने अनुक्रमे लखनऊ, रांची आणि दिल्ली या शहरांमध्ये खेळले जातील.
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रीका टी-20 मालिकेचे वेळापत्रक
पहिला टी-20 सामना – 28 सितंबर, तिरुवनंतपूरम
दुसरा टी-20 सामना – 2 ऑक्टोबर, गुवाहाटी
तीसरा टी-20 सामना – 4 ऑक्टोबर, इंदोर
भारत विरुद्ध दक्षिण अफ्रीका एकदिवसीय मालिकेचे वेळापत्रक
पहिला एकदिवसीय सामना – 6 ऑक्टोबर, लखनऊ
दुसरा एकदिवसीय सामना – 9 ऑक्टोबर, रांची
तिसरा एकदिवसीय सामना – 11 ऑक्टोबर, दिल्ली
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका टी-20 क्रिकेटमधील आकडेवारी –
भारत आणि दक्षिण आफ्रिका संघांमध्ये यापूर्वी एकूण 20 टी-20 सामने खेळले गेले आहेत. या सामन्यांपैकी 11 सामने भारताने, तर 8 सामने दक्षिण आफ्रिका संघाने जिंकले आहेत. उभय संघातील एक सामना असा होता, ज्यामध्ये त्यांचा निकाल लागू शकला नाही. दक्षिण आफ्रिका संघाने यापैकी 9 सामने भारतात खेळले आहेत. भारतात त्यांची आकडेवारी चांगली राहिली आहे. आफ्रिकी सघाने या 9 सामन्यांपैकी तीन 5 सामने जिंकले, तर तीन सामन्यांमध्ये पराभव स्वीकारला आहे. आता उभय संघातील आगामी टी-20 मालिकेवर सर्वांचे लक्ष असेल.
टी-20 मालिकेसाठी निवडलेले दोन्ही संघ –
भारत – रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुड्डा, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), आर अश्विन, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, अर्शदीप सिंह, मोहम्मद शमी, हर्षल पटेल, दीपक चाहर, जसप्रीत बुमराह.
दक्षिण अफ्रीका – टेम्बा बवुमा (कर्णधार), क्विंटन डी कॉक, रीजा हेंड्रिक्स, हेनरिक क्लासेन, केशव महाराज, एडेन मार्करम, डेविड मिलर, लुंगी एनगिडी, एनरिच नोर्किया, वेन पार्नेल, ड्वेन प्रिटोरियस, कागिसो रबाडा, रिली रोसेयु, तबरेज शम्सी, ट्रिस्टन स्टब्स.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
आंतरराष्ट्रीय टी-20मध्ये ‘असा’ विक्रम करणारा विराट पहिलाच! ऑस्ट्रेलियन दिग्गजाला टाकले मागे
IND vs AUS | गोलंदाज नाही करू शकले रोहितला खुश, मालिका जिंकल्यानंतर कर्णधार म्हणाला…
हाताने बेल्स पडूनही मॅक्सवेल बाद! नेमकं काय घडलं? पाहा व्हिडिओ






