विराट कोहली (virat kohli) याच्या नेतृत्वातील भारताचा कसोटी संघ सध्या दक्षिण अफ्रिका दौऱ्यावर (south africa tour of india) आहे. दक्षिण अफ्रिका दौऱ्यात भारताला तीन सामन्यांची कसोटी आणि एकदिवसीय मालिका खेळायची आहे. दक्षिण अफ्रिका दौऱ्यासाठी रवाना होण्यापूर्वी भारताचा दिग्गज सलामीवीर रोहित शर्माला (rohit sharma) दुखापत झाली आणि त्याने कसोटी मालिकेतून माघार घेतली होती. त्यामुळे आगामी कसोटी मालिकेत भारतीय संघाचे कोणते खेळाडू डावाची सुरुवात करणार? याबाबत अद्यापही पेच कायम आहे.
उभय संघातील पहिला कसोटी सामना सेंचुरियनच्या सुपर स्पोर्ट्स पार्कमध्ये खेळला जाणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार १.३० वाजता सुरू होईल. रोहितसोबतच युवा फलंदाज शुभमन गिल देखील दुखापतीच्या कारणास्तव कसोटी मालिकेत सहभागी होऊ शकला नाही. अशात भारतीय संघाच्या डावाची सुरुवात करण्यासाठी केएल राहुल आणि मयंक अगरवाल या दोन फलंदाजांच्या नावाची चर्चा आहे. या दोघांना देखील अशी अपेक्षा आहे की, पहिल्या सामन्यात त्यांना भारताच्या डावाची सुरुवात करण्याची संधी मिळेल.
केएल राहुल आणि मयंक अगरवालने आतापर्यंत भारतीय संघासाठी अनेकदा महत्वपूर्ण प्रदर्शन करून दाखवले आहे. रोहित आणि गिलच्या अनुपस्थितीत राहुल आणि मयंकची जोडी सलामीवीरांची भूमिका पार पाडेल असा सर्वांचाच अंदाज आहे. या दोन्ही फलंदाजांमध्ये चांगला ताळमेळ आहे. बीसीसीआयने गुरुवारी (२३ डिसेंबर) या दोघांमधील चर्चेचा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत दोघांनी भारताकडून डावाची सुरुवात करण्यासाठी ते वाट पाहत असल्याचे संकेत दिले होते.
हेही वाचा- एकवेळ वाटलेलं कधी कसोटी खेळायलाही मिळणार नाही, आता तोच बनलाय भारताचा उपकर्णधार
राहुल या व्हिडिओत म्हणाला की, “आशा आहे की, मी आणि मयंक २६ डिसेंबरला पहिल्यांदा फलंदाजी करण्यासाठी उतरू शकतो आणि आमच्या संघाला चांगली सुरुवात देऊ शकतो.” अशात पहिल्या सामन्यात हे दोघे भारताच्या डावाची सुरुवात करतील याची पूर्ण शक्यता आहे. परंतु दुसरीकडे अनुभवी चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे यांच्या संघातील स्थानाविषयी अनिश्चितता वर्तवली जात आहे. नुकतेच कसोटी पदार्पण केलेला श्रेयस अय्यर या दोघांपैकी एका खेळाडूची जागा घेऊ शकतो.
दरम्यान, रोहित शर्माला दक्षिण अफ्रिका दौऱ्यापूर्वी भारताच्या एकदिवसीय संघाचा कर्णधार आणि कसोटी संघाचा उपकर्णधार बनवले गेले होते. परंतु रोहितने दुखापतीमुळे कसोटी मालिकेतून माघार घेतल्यानंतर केएल राहुल या कसोटी मालिकेत संघाचे उपकर्णधारपद सांभाळणार आहे.
महत्वाच्या बातम्या –
समालोचक की प्रशिक्षक? काय आहे रवी शास्त्रींचा फ्युचर प्लॅन? स्वतः दिले उत्तर
जेव्हा सगळ्या टीम इंडियाला सोडलं, पण हरभजन सिंगला मात्र न्यूझीलंडच्या विमानतळावर पकडलं
…म्हणून कोट्यावधी खर्च करून मनिष पांडेला बनविले जाणार आरसीबीचा कर्णधार!
व्हिडिओ पाहा –