भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिला एकदिवसीय सामना शुक्रवारी खेळला गेला. जो की सामना टाय झाला. खर तर हा सामना भारत सहजरित्या जिंकला असता. पण महत्तवाच्या वेळी टीम इंडिया आपल्या पायावरच कुऱ्हाड मारुन घेतली. श्रीलंकेचा टाॅप ऑर्डर भारताच्या आक्रमक गोलंदाजी समोर ढेपाळला होता. पण एक टोक सांभाळून पथुम निसंका (56) आणि खाल्या फळीतील दुनिथ वेलालागे (67*) या दोन फलंदाजाच्या अर्धशतकाच्या जोरावर यजमान संघ 8 विकेट गमावून 230 धावा केल्या पत्युत्तरात भारतीय संघ श्रीलंकेच्या फिरकीपटूंसमोर 47.5 षटकात 230 धावांवर सर्वबाद झाला. आणि सामना टाय झाला.
टीम इंडियाकडे हा सामना जिंकण्यासाठी पुरेसे चेंडू शिल्लक होते. सामन्याच्या शेवटच्या 18 चेंडूत भारताला विजयासाठी फक्त 5 धावांची गरज होती आणि त्यांच्या हातात 2 विकेट शिल्लक होत्या. भारताच्या डावाच्या 48व्या षटकात श्रीलंकेचा कर्णधार चारिथ असलंका गोलंदाजी करायला आला. त्यावेळी भारतीय संघासाठी अष्टपैलू शिवम दुबे आणि मोहम्मद सिराज हे क्रीझवर उपस्थित होते. शिवम दुबेने फटकेबाजी केली आणि भारताला विजयासाठी 5 धावांची गरज होती. 48व्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर शिवम दुबेने चौकार मारला आणि दोन्ही संघांची धावसंख्या समान झाली.
आता यापुढे इथून टीम इंडियाला विजयासाठी 15 चेंडूत 1 धाव करायची होती. शिवम दुबे आणि मोहम्मद सिराजच्या साथीने 15 चेंडूत 1 धाव काढणे खूप सोपे काम होते. 2 विकेट हातात असतानाही शिवम दुबेने 48व्या षटकातील चौथ्या चेंडूवर घाई केली आणि त्याची विकेट गमावली. शिवम दुबेला शेवटपर्यंत टिकून राहावे लागले. 48व्या षटकातील चौथ्या चेंडूवर श्रीलंकेचा कर्णधार चारिथ असलंकाने शिवम दुबेला पायचित करुन बाद केले. यानंतर पुढच्याच चेंडूवर अर्शदीप सिंग क्रीझवर येताच त्याने षटकार खेचण्याच्या प्रयत्नात तो खाते न उघडताच बाद झाला. अशाप्रकारे टीम इंडियाला शेवटच्या 15 चेंडूत 1 धावही करता आली नाही. शिवम दुबेने थोडा संयम दाखवला असता तर सामना बरोबरीत सुटला नसता. एकप्रकारे भारताने हा सामना गमावला. असे म्हणले तर वावगं ठरणार नाही.
हेही वाचा-
भारत विरुद्ध श्रीलंका सामना टाय, मग सामनावीराचा पुरस्कार कोणाला मिळाला?
मेगा लिलावापूर्वी हार्दिकचा पत्ता कट! मुंबई इंडियन्स रोहित-सूर्यकुमारसह या 4 खेळाडूंना कायम ठेवणार
‘मिरॅकल गर्ल’ मनू भाकर पदकांच्या ऐतिहासिक हॅट्ट्रिकच्या जवळ, लक्ष्यही पहिल्या मेडलपासून एक पाऊल दूर