कोलंबो- भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातील दुसरा कसोटी सामना आजपासून कोलंबो येथे सुरु होणार आहे. या सामन्यात जिंकून भारत मालिकेत विजयी आघाडी घेण्यासाठी उत्सुक आहे.
भारताचा हा श्रीलंकेतील २३ वा कसोटी सामना असून दोन्ही संघांनी प्रत्येकी ७ सामन्यांत विजय मिळवले आहेत.
भारतीय कर्णधार आज सलामीवीर म्हणून केएल राहुलच्या साथीला कुणाला संधी देतो याबद्दल अद्याप चित्र स्पष्ट झालेले नाही. शिखर धवन आणि अभिनव मुकुंद या दोन खेळाडूंमध्ये संघात स्थान मिळवण्यासाठी जोरदार चुरस आहे. दोनही खेळाडूंनी पहिल्या कसोटीमध्ये चांगली कामगिरी केली आहे.
भारतीय संघाची नवीन वॉल अर्थात चेतेश्वर पुजाराचा हा ५०वा कसोटी सामना आहे. सध्या श्रीलंका दौऱ्यावर असणाऱ्या संघातील केवळ तीन खेळाडू यापूर्वी ५० कसोटी सामने खेळले आहेत.
यातून निवडले जाणार संघ
भारत : विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन , लोकेश राहुल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा, रविचंद्रन आश्विन, रवींद्र जडेजा, रिद्धिमान साहा, ईशांत शर्मा, उमेश यादव, हार्दिक पांड्या, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, कुलदीप यादव, अभिनव मुकुंद.
श्रीलंका : दिनेश चांदीमल (कर्णधार), अँजेलो मॅथ्यूज, उपुल थरंगा, दिमुथ करुणारत्ने, निरोशन डिकवेला, कुशाल मेंडिस, धनंजय डिसिल्व्हा, धनुष्का गुणतिलका, लाहिरू कुमारा, विश्वा फर्नांडो, नुवान प्रदीप, रंगना हेरथ, दिलरूवान परेरा, मलिंडा पुष्पकुमारा, लक्षण संदाकन, लाहिरू तिरिमाने.