भारत आणि श्रीलंका (India vs Sri Lanka) या दोन संघांमध्ये दिवस-रात्र कसोटी सामना पार पडला. या सामन्यात भारताने २३८ धावांनी विजय मिळवला. दुसऱ्या कसोटीतील दुसऱ्या दिवसातील अखेरच्या सत्रात एक अजब घटना घडली. सामन्यादरम्यान तीन दर्शक सुरक्षा घेरा तोडून मैदानात घुसले. सुरक्षा रक्षकांनी बाहेर करण्यापूर्वी त्यापैकी २-३ दर्शकांनी विराट कोहलीसोबत (Virat Kohli) सेल्फी सुद्धा काढली. त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
या घटनेनंतर खेळाडूंच्या सुरेक्षेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपायच्या अगोदर जसप्रीत बुमराहने (Jasprit Bumrah) सुरक्षा घेरा तोडून आतमध्ये गेल्याबद्दल प्रतिक्रिया दिली आहे. हा प्रकार श्रीलंकेच्या दुसऱ्या डावाच्या सहाव्या षटकात घडला. जेव्हा मोहम्मद शमीचा चेंडू लागल्यानंतर श्रीलंका संघाचा खेळाडू कुसल मेंडिसची फिजिओ तपासणी करत होते.
या घटनेचा फायदा घेत तीन दर्शक मैदानात उतरले. दोघे स्लीपवर उभा असलेल्या विराट कोहलीपर्यंत पोहोचण्यात देखील ते यशस्वी झाले. यापैकी एकाने आपला फोन काढला आणि विराटकडे सेल्फीची मागणी केली.
https://twitter.com/imarafaat7/status/1503057355163938817
या घटनेवर भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह म्हणाला की, “यावर आमचे नियंत्रण नव्हते. सुरक्षा हा चिंतेचा विषय आहे. अचानकच आम्हाला समजले की, तीन दर्शक मैदानात घुसले होते. परंतु अधिकारी मध्ये आले. आम्हाला माहित नाही की, यावर काय बोलायला हवे. खेळासाठी खूप क्रेज आहे आणि कधी कधी चाहते भावनिक सुद्धा होतात. या मालिकेत ही घटना पहिल्यांदाच घडली आहे. मोहाली कसोटीत सुद्धा अधिकाऱ्यांची पकड मजबूत असताना एका खेळाडूने मैदानात घुसण्याचा प्रयत्न केला होता.”
भारतीय संघ-
रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन (यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर, संजू सॅमसन, रवींद्र जडेजा, वेंकटेश अय्यर, दीपक हुडा, हर्षल पटेल, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, युझवेंद्र चहल, मयंक अगरवाल, कुलदीप यादव, आवेश खान, मोहम्मद सिराज, रवी बिश्नोई.
श्रीलंका संघ-
पाथम निसंका, कामिल मिश्रा, जेनिथ लियानागे, चारिथ असलंका, दिनेश चंडीमल (यष्टीरक्षक), दसून शनका (कर्णधार), चमिका करुणारत्ने, दुष्मंथा चमीरा, प्रवीण जयविक्रमा, जेफ्री वेंडरसे, लाहिरू कुमारा, धनंजय डी सिल्वा, निरोशान डिकवेल्ला, दनुष्का गुलतिलका, बिनुरा फर्नांडो, अशियान डॅनियल, शिरान फर्नांडो.
महत्त्वाच्या बातम्या-
हे काय नवीन! इंग्लंडची फलंदाज गर्रकन फिरली अन् उलटा शॉट मारत झाली आऊट; व्हिडिओ ठरतोय लक्षवेधी
‘असा’ नकोसा विक्रम कुणाच्याही नावावर नको! महिला विश्वचषकात पराभवाच्या बाबतीत पाकिस्तानने कापलं नाक