भारत-श्रीलंका यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामना बंगळुरु येथे सुरु आहे. भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा याने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. (Rohit Sharma won toss and have opted to bat first)
बंगळुरुतील चिन्नास्वामी क्रिकेट स्टेडियमवर भारत आणि श्रीलंका (India vs Sri Lanka) या दोन्ही संघात दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील अंतिम आणि निर्णायक सामना होत आहे. (India And Sri Lanka Second Test Match) तत्पूर्वी मोहाली येथील पहिला सामना जिंकून भारताने मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. आता अखेरचा सामना जिंकून मालिकेवर २-० असे निर्विवाद वर्चस्व गाजवण्यासाठी भारताची रोहितसेना सज्ज आहे.
अशी आहे दोन्ही संघाची प्लेइंग इलेव्हन : (Playing XI of India and Sri Lanka)
पहिला कसोटी सामना जिंकल्यानंतर भारतीय संघ प्लेइंग इलेव्हनमध्ये काही बदल करणार नाही, असे बोलले जात होते. तरिही भारताने संघात बदल केले आहेत. तर श्रीलंकेनेही दुसरा आणि अखेरचा कसोटी सामना जिंकण्यासाठी संघात काही बदल केले आहेत.
भारताकडून अक्षर पटेलला संघात स्थान देण्यात आले आहे. तर, श्रीलंका संघाने कुसल मेंडीस आणि प्रवीण जयविक्रमा यांचा संघात समावेश केलाय.
भारताची प्लेइंग इलेव्हन :
बंगळूरु कसोटीत खेणारे भारतीय संघाचे प्रमुख ११ खेळाडू खालीलप्रमाणे,
मयंक अग्रवाल, रोहित शर्मा (कर्णधार), हनुमा विहारी, विराट कोहली, रिषभ पंत (यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर, रविंद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह
श्रीलंका संघाची प्लेइंग :
विजयासाठी आसूसलेल्या श्रीलंका संघाची बंगळुरु कसोटीसाठीची प्लेइंग इलेव्हन खालील,
दिमुथ करुणारत्ने (कर्णधार), लहिरू थिरिमाने, कुसल मेंडिस, अँजेलो मॅथ्यूज, धनंजय डी-सिल्वा, चरिथ असलंका, निरोशन डिकवेला (यष्टीरक्षक), सुरंगा लकमल, लसिथ एम्बुल्डेनिया, विश्व फर्नांडो, प्रवीण जयविक्रमा
(India vs Sri Lanka Second Test Match at Bangalore Captain Rohit Sharma won toss See Playing XI)
अधिक वाचा :
‘चकदाह एक्सप्रेस’ झुलन गोस्वामीने विश्वचषकात रचला इतिहास! तब्बल ३४ वर्षांपूर्वीचा मोडलाय विश्वविक्रम






