पल्लेकेल: आज श्रीलंकेविरुद्ध खेळताना फक्त तिसरा कसोटी सामना खेळत असणाऱ्या भारताच्या हार्दिक पंड्याने अशी काही लंकेची धुलाई केली की शेवटी श्रीलंकेच्या कर्णधाराने ८ खेळाडू सीमारेषेवर तैनात केले होते.
८६ चेंडूत शतकी खेळी करताना ९६ चेंडूंचा सामना करताना त्याने १०८ धावा केल्या. यात त्याच्या ८ चौकार आणि ७ षटकार खेचले. अशा या हार्दिक पंड्याने आज केलेले हे विक्रम !
३
कपिल देव आणि एमएस धोनी नंतर सलग तीन षटकार खेचणारा पंड्या केवळ तिसरा भारतीय खेळाडू
५
फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये एकही शकत न करता सरळ आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतक करण्याची पंड्याकडून कामगिरी. यापूर्वी विजय मांजरेकर, कपिल देव, अजय रात्रा आणि हरभजन सिंगकडून ही कामगिरी.
२
परदेशी भूमीवर भारतीय फलंदाजाने वेगवान शतक करण्याची दुसरी वेळ. यापूर्वी सेहवागने वेस्ट इंडिजमध्ये ७८ चेंडूत २००६ साली शतकी खेळी केली होती.
६
भारताकडून ६व्या क्रमांकाच वेगवान कसोटी शतक
१
भारताकडून लंच पूर्वी सर्वात जास्त अर्थात १०७ धावा करण्याचा विक्रम पंड्याच्या नावावर
८१
भारताकडून कसोटी शतक करणारा पंड्या केवळ ८१वा खेळाडू. भारताने आजपर्यत कसोटीमध्ये ४८३ शतक केली आहेत.
२६
भारताकडून यावर्षी हार्दिक पंड्याने तब्बल २६ आंतरराष्ट्रीय षटकार खेचले आहेत. पंड्याने नंतर कोहली(१९), जडेजा(१४), धोनी(१३) आणि युवराज (१०) यांचा नंबर लागतो.
४
या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणाऱ्या खेळाडूंच्या यादीत पंड्या चौथ्या स्थानी.
२
एका कसोटी डावात सर्वाधिक षटकार मारणाऱ्या भारतीय खेळाडूंच्या यादीत पंड्या नवजोत सिंग सिद्धू नंतर दुसऱ्या स्थानी. सिद्धू(८), पंड्या(७), सेहवाग(७) आणि हरभजन सिंग(७) यांनी यापूर्वी भारताकडून विक्रमी षटकार खेचले आहेत.
४
भारतीय वेगवान गोलंदाजाने शतक आणि विकेट घेण्याची ही चौथी वेळ. यापूर्वी आगरकर (वि. इंग्लंड २००२), गांगुली(वि. पाकिस्तान २००७), इरफान पठाण (वि. पाकिस्तान २००७) आणि आज हार्दिक पंड्या यांनी हा पराक्रम केला आहे.
२६
एका षटकात २६ धावा करणार पंड्या पहिला भारतीय.